हजारो वर्षांपूर्वीच्या श्रीरामांच्या मूर्तीची चोरी
जालना- घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ येथे समर्थ रामदास स्वामींच्या जन्म ठिकाणी असलेल्या श्रीराम मंदिरातील हजारो वर्षांपूर्वीच्या मुर्त्या आज पहाटे चोरीला गेले आहेत. त्यामुळे परिसरातील भाविकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. समर्थ रामदास स्वामी महाराज यांनी सुमारे 1535 मध्ये या मूर्तींची स्थापना केली होती. पंचधातूमध्ये असलेल्या या मूर्ती आजही तेजस्वी दिसत होत्या.
दरम्यान मंदिर बंद केल्यानंतर या कुलपाची किल्ली एका ठराविक ठिकाणी ठेवली जाते, ही किल्ली चोरांनी चोरून नेली आणि परत चोरी झाल्यानंतर कुलूप लावून जिथल्या तिथे ठेवून दिली अशी चर्चा परिसरामध्ये होत आहे. राम लक्ष्मण सीता आणि पंचायतन असा अमूल्य ठेवा चोरट्यांनी पळून नेला आहे. घटनास्थळी घनसांगीचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी पोहोचून पाहणी केली आहे. असा हा पुरातन ठेवा शोधून काढण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com