हे तर विध्वंसक कृत्य!- भूषण स्वामी
घनसावंगी -मुळातच चैतन्य प्राप्त असलेल्या आणि त्यामध्ये पुन्हा समर्थांचा स्पर्श झालेल्या अशा दिव्य मूर्ती चोरून नेणे म्हणजे विध्वंसक कृत्यच आहे. याचा तपास प्रशासकीय यंत्रणेने त्वरित लावला पाहिजे अशी मागणी समर्थ रामदास स्वामींचे अकरावे वंशज भूषण स्वामी यांनी केली आहे.
घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ येथील श्रीराम मंदिरातील पुरातन मूर्ती दोन दिवसांपूर्वी चोरीला गेल्या आहेत. त्या संदर्भात ते बोलत होते पुढे बोलताना भूषण स्वामी म्हणाले की, महाराष्ट्रातील शक्ती पीठ,भक्तिपीठ, समर्थ संप्रदाय, यांच्यासारख्या अनेक आध्यात्मिक संप्रदायावर मूर्ती चोरी झाल्यामुळे आघात झाला आहे. सामान्य माणसांना देखील याचे दुःख आहे. हे विध्वंसक कृत्य आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह घनसावंगी चे आमदार राजेश टोपे, यांनी याची दखल घेतली आहे, परंतु अद्याप पर्यंत तपास लागलेला नाही. या मूर्ती सापडाव्यात म्हणून अनेक ठिकाणी उपासना, जप, यज्ञ ,याग अशा पद्धतीचे धार्मिक विधी सुरू झाले आहेत .या सर्व विधींचा एकत्रित परिणाम होईल आणि मूर्ती सापडतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान मूर्ती पुन्हा स्थापित व्हाव्यात म्हणून गावकरी देखील मोठ्या परीने संयम बाळगून आहेत, आणि पूर्ण सहकार्य मिळत असून त्यांनाही दुःख झाल्याचेही भूषण स्वामी यांनी सांगितले.
*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com