Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

लिंबोणी खून प्रकरण; आरोपीला दहा वर्षाची शिक्षा एक लाख रुपये दंड

अंबड- जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात असलेल्या लिंबोणी येथे दिनांक 26 मार्च 2021 रोजी झालेल्या खून झाला होता.या प्रकरणाचा तपास पोलिसांनी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असता अवघ्या दीड वर्षांमध्ये न्यायालयाने आरोपीला खून प्रकरणात दोशी ठरवले आहे आणि दहा वर्षाची शिक्षा तसेच एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

 

* असे आहे प्रकरण* दिनांक 26 मार्च 2021 रोजी लिंबोणी येथील कुंभार पिंपळगाव कडे जाणाऱ्या रस्त्यावर आरोपी मधुकर पंढरीनाथ काळे वय 32, राहणार लिंबोणी ,तालुका घनसावंगी याने या प्रकरणातील तक्रारदार सखाराम सिताराम काळे आणि एकनाथ आसाराम काळे या दोघांना सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास रस्त्यावर अडवून दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र दोघांनीही नकार देताच मधुकर काळे यांनी एकनाथ काळे यांच्या पोटामध्ये चाकू खुपसला. यामध्ये एकनाथ काळे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आसाराम काळे यांनी दिनांक 27 मार्च 2021 रोजी घनसांवगी पोलीस ठाण्यात भादवि कलम 302 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला होता .त्या अनुषंगाने पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले आणि अवघ्या दीड वर्षातच अंबड सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रल्हाद भगुरे यांनी मधुकर पंढरीनाथ काळे याला दहा वर्षाची शिक्षा आणि एक लाख रुपये दंड ठोठावला आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले त्यामध्ये सखाराम सिताराम काळे, कमलाकर आसाराम काळे, तपास अधिकारी पी.पी. माने यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या .सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोगता व्ही. एन. चौकीदार यांनी काम पाहिले तर त्यांना कोर्ट पी पैरवी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

*एम.डी. पोहनेरकर* 8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button