चार गाई दोन वासरांचा विजेच्या झटक्याने तर दोन बैलांचा गाळात फसून मृत्यू
कुंभार पिंपळगाव/ परतुर- परतूर तालुक्यातील आंबा येथे असलेल्या बागेश्वरी देवीला सोडलेल्या सुमारे 12 पैकी चार गाईंचा आणि दोन वासरांचा विजेच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. घनसावंगी तालुक्यातील घोणशी येथे पोळ्यानिमित्त बैलांना धुण्यासाठी खदानीत घेऊन गेलेल्या दोन्ही बैलांचा पाय फसल्यामुळे मृत्यू झाला आहे आणि पोळ्याच्या दिवशीची दुर्घटना घडल्यामुळे बळीराजांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
विशेष करून बागेश्वरी देवीला सोडलेल्या गाईंचा एकदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्यामुळे महिलांमध्येही संताप व्यक्त होत आहे.बागेश्वरी देवीचे पुजारी सुरेश केशवराव जोशी वय 59. यांनी परतुर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की गावातील भाविकांनी बागेश्वरी देवीला सुमारे 15 गाई सोडलेल्या आहेत. आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास
गावातील शेतकरी बाबु नासेरुद्दीन खतीफ यांच्या मालकीचे शेत बटाईने करीत असलेला शेख लतीफ शेख मुकुम, रा. आंबा ता. परतुर याने शेताचे बाजुने तार लावुन त्यामध्ये ईलेक्ट्रीक करंट सोडल्याने बागेश्वरी देवीस सोडलेल्या 12 ते 15 गाई व वासरापैकी 4 गाई 2 लहान गोरे ( वासरु) हे या तारेला अडकुन विजेचा झटका लागुन मरण पावले आहे व ईतर गाई व वासरे बेपत्ता झालेले आहेत . शेख लतीफ शेख मुकुल याने शेताच्या बाजुस तार लावुन त्यामध्ये करंट सोडल्याने त्यामध्ये बागेश्वरी देवीस सोडलेल्या 4 गाई व 2 गोरे (वासरु) मरण पावले असुन 15 लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे .त्यांच्या मरणाला शेख लतीफ शेख मुकुम कारणीभुत झाला आहे .
*****
घनसावंगी तालुक्यातील घोन्सी बु.येते शेतकरी सीताराम आव्हाड हे पोळ्या निमित्ताने आपली बैल जोडी धुण्यासाठी गावातील खंदाणीत नेली असता बैलांचे पाय खंदाणीत असलेल्या गाळत फसून त्यांचा त्याठिकाणी मृत्यू झाला. पोळ्याच्या दिवशीच दुखतं घटना घडल्या मूळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.किमान एक लाख रुपयांची बैल जोडी होती.सणाच्या दिवशीच बळीराजावर हा आघात झाला आहे त्यामुळे शासनाने शेतकऱ्याला मदत करावी अशी मागणी गावातील शेतकऱ्यांनी केली आहे.
*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com