Jalna Districtजालना जिल्हा

पोलिसांचा क्रीडा स्पर्धेला “सायोनारा”

जालना-जिल्हा पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांनी नावलौकिक मिळवून भारताचे नाव उज्वल करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले आहे.


जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धांचा समारोप शनिवार दिनांक 27 रोजी झाला. या समारोपानंतर बक्षीस वितरणाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी बोलत होते.यावेळी व्यासपीठावर पोलीस अधीक्षक डॉ.अक्षय शिंदे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांची उपस्थिती होती.

दरम्यान पोलीस कवायत मैदानावर झालेल्या स्पर्धांमध्ये पोलिसांनी तर भाग घेतलाच होता पण त्यांच्या परिवारातील सदस्यांनीही भाग घेऊन उस्फुर्त प्रतिसाद नोंदविला. स्पर्धांमध्ये नऊ वर्षाच्या धनश्री प्रशांत उबाळे हिने 20 किलो वजन उचलून वेटलिफ्टिंग प्रकारात आपली चुणूक दाखविली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते तिचा विशेष सत्कार करण्यात आला .या स्पर्धा आयोजित करण्यामागील उद्देश पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी आपल्या प्रास्ताविकात विशद केला. जिल्हाधिकाऱ्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले.स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक संजय व्यास, पोलीस कर्मचारी संजय सोनवणे ,यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com

Related Articles