…तर होणाऱ्या परिणामांची जबाबदारी प्रशासनाची.
जालना- श्रीक्षेत्र जांब समर्थ येथील श्रीरामांच्या पुरातन मूर्ती चोरीला जाऊन आठ दिवस झाले मात्र अद्याप पर्यंत तपास लागलेला नाही. या पार्श्वभूमीवर धार्मिक धार्मिक संस्थानं आता एकवटली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या मूर्तीचा त्वरित तपास लावावा अन्यथा जी परिस्थिती उद्भवेल त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल असा इशारा आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटून श्रीराम भक्त आणि विविध मंदिराच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः जांब समर्थ येथे जाऊन सध्य परिस्थितीची माहिती घ्यावी आणि तपास यंत्रणेला सूचना द्याव्यात अशी मागणीही केली.दरम्यान चोरी गेलेल्या मूर्तींमध्ये 700 वर्ष पुरातन असलेल्या श्रीरामाच्या पंचायतन मधील मूर्ती आहेत. त्यामध्ये श्रीराम, सीता, भरत, शत्रुघ्न, हनुमान यांचा समावेश आहे.
आज हे निवेदन देण्यासाठी शहरातील श्रीराम संस्थान आनंदवाडी, श्रीराम संस्थान बडी सडक, आनंदी स्वामी महाराज संस्थान, पाताळ हनुमान मंदिर, हनुमान मंदिर गवळी मोहल्ला, रामदेव बाबा संस्थान ,अशा शहरातील जवळपास 30 संस्थांनच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये रामदास महाराज आचार्य, मनोज महाराज गौड, अशोक शहाणे, धनसिंग सूर्यवंशी, विनायक दसरे, सुनील जोशी, कल्याणराव देशपांडे, परसराम मुंदडा, सिद्धिविनायक मुळे, सौ. शुभांगी देशपांडे, निलावती धावणे, आदींचा समावेश होता.
*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com