संतप्त वीज ग्राहकाची कार्यालयात तोडफोड
जालना-खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज ग्राहकाने वारंवार तक्रार निवारण केंद्रात संपर्क केला. परंतु नेहमीप्रमाणे प्रतिसाद मिळत नसल्याने वीज ग्राहकाने संतापून या कार्यालयातील तोडफोड करून आपला राग व्यक्त केला.
मंठा शहरात राहणाऱ्या शेषनारायण मधुकर दवणे यांची दोन दिवसांपासून वीज गायब झाली होती. वारंवार फोन करूनही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यातच सणाचे दिवस त्यामुळे संतापलेल्या शेषनारायण दवणे यांनी दिनांक 1 सप्टेंबर रोजी साडेपाच वाजेच्या सुमारास 33 के.व्ही.वीज उपकेंद्र गाठले, परंतु तिथं कोणीच नव्हते त्यामुळे ते आणखीच संतापले आणि कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली. दरम्यान या प्रकरणी वीज कंपनीचे कर्मचारी सिद्धार्थ सहदेवराव नागले यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंठा पोलीस ठाण्यात शेषनारायण दवणे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com