परतुर पोलिसांची शंभर तरुणांची समांतर यंत्रणा
परतूर-गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेवर पडणारा ताण, आणि नियमित होणाऱ्या गुन्हेगारीला अळा घालून तपासामध्ये मदत होण्याच्या दृष्टीने ,परतुर पोलिसांनी शंभर तरुणांची फौज तयार केली आहे.” पोलीस मित्र” म्हणून ही फौज परतूर पोलिसांसाठी काम करणार असून त्या संदर्भातच्या योग्य सूचना उपविभागीय पोलीस अधिकारी राजू मोरे यांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षक शामसुंदर कोठाळे यांनी दिल्या आहेत.
अठरा वर्षाची ही तरुण मुले परतु शहरासह तालुक्यातील विविध गावातून निवडण्यात आली आहेत. त्यांना टी-शर्ट आणि कॅप देण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस मित्र म्हटलं की हा गणवेश आता सर्वांच्या लक्षात राहणार आहे. गणेशोत्सव, नवरात्र या दिवसात पोलिस यंत्रणेवर मोठा ताण पडतो त्यावेळी या पोलीस मित्रांची मदत पोलीस यंत्रणेला होणार आहे. तसेच अन्य वेळी देखील या पोलीस मित्रांची मदत पोलीस प्रशासनाला होऊ शकते. त्यामुळे पोलीस निरीक्षक श्री. कोठाळे यांनी पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या परवानगीने ही 100 तरुणांची फौज निर्माण केली आहे.
या तरुणांचा एक व्हाट्सअप ग्रुप असेल आणि या ग्रुप वर ताजी माहिती, घडामोडी या टाकल्या जाणार आहेत. त्यामुळे तालुक्यामध्ये कुठे काय झाले हे क्षणार्धात पोलिसांना कळणार आहे. नुकत्याच झालेल्या या टी-शर्ट आणि कॅप वाटपाच्या कार्यक्रमाला उपविभागी पोलीस अधिकारी राजू मोरे, पोलीस निरीक्षक शामसुंदर कोठाळे, डॉ. संजय पुरी उपप्राचार्य श्री. तिडके रमाकांत बरीदे ,आदि मान्यवरांची उपस्थिती होती.
*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com