पत्नीने केला पतीचा खून , 30 तासानंतर मृतदेहाला जाळून टाकण्याचा प्रयत्न फसला
जालना-साथीदाराच्या मदतीने नवऱ्याचा खून करून मृतदेह 30 घंटे घरात ठेवला, त्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी गॅसचा स्फोट झाल्याचा बनाव करणाऱ्या पत्नीचा तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संभाजी वडते यांनी तपास लावल्याबद्दल सध्या त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या किचकट आणि सामान्य माणसाला चक्रावून टाकणाऱ्या घटनेची हकीकत अशी आहे. जाफराबाद तालुक्यातील खासगाव येथे राहणाऱ्या मनीषा किरण लोखंडे यांचा विवाह वकील किरण लोखंडे यांच्यासोबत मे 2022 मध्ये झाला. अवघ्या चार महिन्यातच या दोघांमधील भांडनं वाढली त्यामुळे किरण लोखंडे यांनी तिचा साथीदार गणेश मिठू आगलावे, वय 23 वर्षे राहणार वाल्हा ,तालुका बदनापूर यांच्या मदतीने खून केला. दिनांक 31 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या एक वाजेच्या सुमारास या दोघांनी लोखंडी पाईप डोक्यात मारून विधीज्ञ किरण लोखंडे याचा खून केला .त्याचे नाक व तोंड दाबून ठार मारले आणि मृतदेह घरातच ठेवून घराला कुलूप लावून दोघेही निघून गेले. त्यानंतर दिनांक एक सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हे दोघांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. ती कशी लावायची हा विचार करत असतानाच त्यांनी घरातील स्वयंपाकाच्या गॅसचा सिलेंडरचा पाईप काढून रेगुलेटर चालू करून ठेवले आणि काडी लावली. त्यामुळे सर्वांचा गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे आणि त्यामध्ये वकील किरण लोखंडे यांच्या मृत्यू झाला असेल असे प्रथम प्रथम दर्शनी वाटले. यामध्ये मृतदेझाल्यामुळे जळाला असल्याचा बनाव करण्याचा त्यांचा प्रयत्न होता मात्र तो फसला. सुरुवातीला या प्रकरणात पत्नीनेच माहिती दिल्यामुळे एडवोकेट किरण लोखंडे यांचा अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती. गॅसचा स्फोट झाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली होती. दरम्यान हा मृत्यू संशयास्पद असल्याची शक्यता पहिल्या दिवसापासून पोलिसांनी वर्तवलेली होती .त्यातच घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ची पाहणी, मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण, आणि साक्षीदारांकडे विचारपूस केली असता एडवोकेट अनिल लोखंडे यांनी दिनांक 30 ऑगस्ट पासून ते एक सप्टेंबर च्या रात्री दहा वाजेपर्यंत कोणाशीही संपर्क केलेला नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला होता. मृतदेहाचा अंत्यविधी झाल्यानंतर पत्नी मनीषा लोखंडे हिच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता तिने सुरुवातीला उडवाउडुची उत्तरे दिली, दरम्यानच्या काळात किरण लोखंडे यांचा आत्या भाऊ दीपक रावसाहेब ठोंबरे, वय 38 वर्ष राहणार, शकुंतला नगर जालना यांनी किरण ची पत्नी मनीषा आणि तिचा साथीदार गणेश आगलावे या दोघांनी खून केला असल्याची तक्रार तालुका पोलीस ठाण्यात दिली .त्यामुळे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि या प्रकरणातील गुंतागुंत बाहेर काढली. या खुनाची कबुली किरण लोखंडे यांची पत्नी मनीषा लोखंडे हिने दिले आहे. केवळ भांडणाच्या कारणावरून हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सांगितले आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र मनीषा लोखंडे आणि तिचा साथीदार गणेश मिटू आगलावे हे जालना येथील एका महाविद्यालयामध्ये डी. फार्मसी चे शिक्षण सोबत घेत होते. त्यामुळे त्यांचे त्याच वेळी प्रेम संबंध जुळले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संभाजी वडते यांनी अवघ्या सात दिवसात पूर्ण करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. त्यामुळे श्री. वडते यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
* गॅसची टाकी न फुटल्यामुळे बळावला संशय. एखाद्या टाकीचा स्फोट होण्यासाठी किंवा ती टाकी फुटण्यासाठी 1000 पेक्षा जास्त डिग्री सेल्सिअसच्या तापमानाची गरज असते. मात्र इथे तशा प्रकारची टाकी फुटल्याचा काहीच पुरावा पोलिसांना सापडला नाही. त्यामुळे हा स्फोट झालाच नाही असा प्रथमदर्शनी अंदाज पोलिसांनी लावला होता आणि तो शेवटी खरा ठरला.
*एम.डी. पोहनेरकर*
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com