मंठा को-ऑपरेटिव 12 कोटींचे अकरातफर :गुन्हा दाखल

जालना बहुचर्चित मंठा अर्बन कॉपरेटिव बँकेच्या बारा कोटींच्या अफरातफर प्रकरणी बँकेच्या विविध शाखेमधील कर्मचाऱ्यांवर काल दिनांक 7 रोजी रात्री उशिरा मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लेखापरीक्षक श्रेणी 2 सहकारी संस्था, जालना. गोपाळ नारायण अवधूत यांनी ही तक्रार दिली असून मंठा पोलीस ठाण्यात भादवि कलम 420, 406, आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .एक एप्रिल2019 ते 31 मार्च 2021 च्या दरम्यान मंठा अर्बन बँक, शाखा मंठा, शाखा सेवली, शाखा जालना, शाखा लक्कडकोट ,आणि चंदनझीरा या विविध शाखेमध्ये आरोपींनी संगणमत करून ठेवीदारांचे मुदत ठेव, तारण कर्ज, तसेच त्यांच्या खात्यातून बनावट सह्या आणि पावती पुस्तक वापरून बारा कोटी 18 लाख 4 हजार 416 रुपयांचा अपहार केल्याचा ठपका या कर्मचाऱ्यांवर आहे.
* हे आहेत ते आरोपी*
1)स्व. प्रकाश हसनराव देशमुख राहणार एरंडेश्वर, तालुका मंठा, मंठा शाखा मुख्य कार्यकारी अधिकारी. 2)अरुण हरिकिशन होंगे नागरजौळा, तालुका मानवत परभणी, शाखा अधिकारी
3)कैलास विठ्ठलराव चव्हाण मंठा, मंठा शाखा पासिंग ऑफिसर
4)गणेश शिवशंकर टाले, मंठा, मंठा शाखा पोस्टिंग ऑफिसर
5) अरुण जनार्दन आडे मंठा शाखा, मंठा पोस्टिंग ऑफिसर.
6) गणेश अच्युतराव अवचार, विडोळी तालुका मंठा, शाखा सेवली शाखाधिकारी
7) विनायक प्रकाश आप्पा कापसे ,विडोळी ,शाखा शिवली पासिंग ऑफिसर.
8) प्रभात बकुळराव कुलकर्णी मंठा ,शाखा सेवली पोस्टिंग ऑफिसर.
9) श्रीमती योगिता मधुकर शिंदे , जालना, लक्कडकोट शाखा अधिकारी.
10) सतीश अंबादास देशमुख, एरंडेश्वर ,शाखा लक्कडकोट पासिंग ऑफिसर.
विजय भुजंगराव चव्हाण परतुर ,शाखा लक्कडकोट पोस्टिंग ऑफिसर .11)
संजय गुलाबराव राठोड जालना, शाखा लक्कडकोट पोस्टिंग ऑफिसर.
12) आबासाहेब कचरू भोसले, जालना, शाखा चंदनझीरा शाखाधिकारी.
13) संजय तात्यासाहेब कदम चंदनझीरा, पासिंग ऑफिसर यांच्यासह अन्यही काही आरोपींवर गुन्हा. दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख हे करीत आहेत.
*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com