कारभारी अंभोरे यांचे उपोषण हाणून पाडण्याचा प्रशासनाचा प्रयत्न

जालना तालुक्यातील पुणेगाव येथील कारभारी अंभोरे यांचे गावातील ग्रामपंचायत समोर गेल्या 17 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने त्यांचे हे उपोषण हाणून पाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
त्याच्याच पार्श्वभूमीवर आज तालुका पोलिसांनी त्यांना बळजबरीने उचलून शासकीय रुग्णालयात भरती केले आहे. दरम्यान या उपोषणाच्या कालावधीमध्ये कारभारी अंभोरे यांचे चार किलो वजन घटले आहे. गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी खोदलेल्या तीन विहिरी या ग्रामपंचायत च्या सातबारावर लावाव्यात, कारण या विहिरीतून संबंधित विहिरीचे मालक पाणी उपसा करत आहेत आणि आणि शेतीला पुरवत आहेत, त्यांना विरोध केल्यानंतर ते गावकऱ्यांना सातबारा दाखवत आहेत. त्यासोबत व्यायाम शाळेच्या जागेवर जी इमारत आहे ती अतिक्रमणाची आहे. तिचा निकाल लावावा तसेच पाणीपुरवठाच्या जलवाहिनी मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी. या प्रमुख तीन मागण्यांसाठी कारभारी अंभोरे यांनी 23 ऑगस्ट पासून उपोषण सुरू केले आहे. वैयक्तिक कोणताही स्वार्थ नसताना गावच्या विकासासाठी सुरू केलेल्या या उपोषणाला काही ग्रामस्थांनी आणि लोकप्रतिनिधींनीही पाठिंबा दिला आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी कारभारी अंभोरे यांना पुणेगाव येथून उचल बांगडी करून आणल्याचा आरोप अंभोरे यांनी केला आहे. दरम्यान जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आपण औषधोपचार देखील घेणार नसणार नसल्याचा निर्धार अंभोरे यांनी केला आहे.
या संदर्भात गटविकास अधिकारी संजय कुलकर्णी यांना विचारले असता ते म्हणाले पहिल्या ग्रामसेवकांनी काय केलेआहे ते माहित नाही, मात्र आता त्यांच्या निवेदनावर कारवाई सुरू आहे, तसेच ज्या विहिरी ग्रामपंचायत च्या मालकीच्या आहेत त्या अजून सातबारावर लागलेल्या नाहीत कारण त्यांचे दानपत्र सापडत नाही, ते शोधण्याचा प्रयत्न चालू आहे. असे सांगितले.
जालना तालुक्यामध्ये ग्रामपंचायतीचे अनेक कारभार आता उघडकीस यायला लागले आहेत मात्र गटविकास अधिकारी चौकशी सुरू आहे, कागदपत्र पाहतो, काम सुरू आहे, एवढीच उत्तर देत आहेत, यापेक्षा पुढे काहीच होताना दिसत नाही. दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून गावचा हा प्रलंबित प्रश्न असल्यामुळे अंभोरे यांनी देखील कुठल्याही परिस्थितीत उपोषण सोडणार नसल्याचा निर्धार केला आहे.
*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com