Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

सामूहिक बलात्कार, सासऱ्याचा आणि दिराचा अल्पवयीन विवाहितेवर बलात्कार, विद्यार्थिनीचा विनयभंग, जिल्ह्यात महिला अत्याचाराचे प्रमाण वाढले

जालना- गेल्या आठ दिवसांपासून जालना जिल्हा बलात्कारांच्या घटनांमुळे ढवळून निघाला आहे चार दिवसांपूर्वी एका पोलीस अधिकाऱ्यासंदर्भातच जिल्ह्यात संतापाची लाट असताना मागील दोन दिवसांपासून महिलांवरील अत्याचारा संदर्भात घडत असलेल्या घटनांनी चांगला चर्चेत आला आहे .

जशी चर्चा वाढत आहे तसा संतापही व्यक्त केला जात आहे. पहिला प्रकरणात बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथे पाच जणांनी एका मानसिक दृष्ट्या अपंग महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या पाच आरोपींपैकी तीन आरोपींना पोलिसांनी पकडून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. दोन आरोपी अद्याप फरार आहेत. दाभाडी येथे राहणाऱ्या सुंदर कोल्हे ,दत्तू खमाटे, बाबासाहेब कोल्हे, लक्ष्मण सोरमारे,संदीप कोल्हे या पाच जणांनी गावातीलच एका मानसिक दृष्ट्या अपंग असलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार केला असल्याची तक्रार बदनापूर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे .त्यानुसार या प्रकरणाचा तपास पिंक मोबाईलच्या पोलीस उपनिरीक्षक निशा बनसोड यांच्याकडे आला. त्यांनी या प्रकरणातील आरोपी सुंदर कोल्हे ,संदीप कोल्हे आणि दत्तू खमाटे यांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान अन्य दोन आरोपी लक्ष्मण सोरमारे आणि बाबासाहेब कोल्हे हे अद्याप फरार आहेत. यांचाही शोध पोलीस घेत आहेत.या सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे बदनापूर तालुका चांगला ढवळून निघाला आहे.

दुसऱ्या प्रकरणात जालना शहरातील साईनगर भागात राहणाऱ्या एका 14 वर्षाच्या अल्पवयीन विवाहितेने सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीत सासरा आणि दिरानेच वारंवार बलात्कार केल्याचे म्हटले आहे. हा प्रकार पतीला आणि सासूला सांगितल्यानंतर या दोघांनीही विवाहितेलाच धमकी देऊन गप्प बसण्यास सांगितले आहे. 14 वर्षीय एका तरुणीला किशोर जगन शिंगणे, याने जवळीक साधून तिला लग्नाचे आम्हीच दाखवले आणि फुस लावून पळून नेऊन मंदिरात हार घालून तिच्याशी लग्न केले. तिला साईनगर भागात घरी आणले.त्या नंतर पती घरी नसताना या प्रकरणातील मुलीचे सासरे जगन गणेश शिंगणे आणि दीर युवराज जगन शिंगणे या दोघांनी पीडितेवर दिनांक 21 मे 2021 ते 29 ऑगस्ट 2022 दरम्यान वारंवार बलात्कार केला. यासंदर्भात पीडितेने या घटनेची माहिती पती किशोर जगन शिंगणे आणि सासू रामकौर जगन शिंगणे यांना दिल्यानंतर या दोघांनीही ते तुझे दीर आहेत, सासरे आहेत काही होत नाही कोणाला सांगू नको असे म्हणत आरोपींना सहकार्य केले आहे. याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात भादवि कलम 363 सह बाल अत्याचार प्रतिबंधात्मक कायदा 2012 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तिसऱ्या तिसऱ्या घटनेत अंबड बस स्थानकात शाळकरी मुलीचा विनयभंग करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील एक विद्यार्थिनी अंबड शहरात शिक्षण घेण्यासाठी येते. बुधवारी ही विद्यार्थिनी परत जाण्यासाठी अंबड बस स्थानकात बस मध्ये चढत असताना गंगाराम वाडी येथील सहा मुलांनी तिची छेड काढली, अश्लील भाषेत शिवीगाळ करून हातवारे केले, आणि विनयभंग केला. त्यामुळे आता विद्यार्थिनींनी शिक्षणासाठी बाहेर पडावे की नाही असाही प्रश्न निर्माण झाला आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button