Jalna Districtजालना जिल्हा

पाटील राजकारणात या!- खोतकरांचे घाडगे पाटलांना आमंत्रण

घनसावंगी -तालुक्यातील देवी दहेगाव येथे असलेल्या समृद्धी शुगर प्रायव्हेट लिमिटेड मध्ये समृद्धी गणेश फेस्टिवल चे आयोजन करण्यात आले होते. गणेशोत्सवाच्या दरम्यान भजन, कीर्तन, समाज प्रबोधन ,यासह मनोरंजनाचेही भरगच्च कार्यक्रम इथे पार पडले. शेवटच्या दिवशी नृत्यांगना माधुरी पवार यांच्या लावण्यांचा बहारदार कार्यक्रम पार पडला आणि ग्रामीण भागात हा कार्यक्रम असल्यामुळे प्रचंड प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमाला माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनीही उपस्थिती लावली होती. ग्रामीण भागात दुर्मिळ होत चाललेल्या लावण्यांच्या कार्यक्रमाला श्रोत्यांनी मोबाईलची बॅटरी चमकून प्रचंड दाद दिली.

दरम्यान याच कार्यक्रमात अर्जुन खोतकर यांनी सतीश घाडगे यांना राजकारणात येण्याचे आमंत्रण दिले आहे. या प्रश्नाला उत्तर देताना घाडगे पाटील म्हणाले “साखर कारखाना चालवत असताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे, कदाचित या अडचणी राजकारणात आल्यानंतर सुटू शकतील असे वाटते. त्यामुळे खोतकर यांनी दिलेल्या निमंत्रणावर विचार करू.”

 

*एम.डी. पोहनेरकर,9422219172*
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com

Related Articles