प्रशासकीय यंत्रणेच्या मदतीला सामाजिक संस्था; मोती तलाव प्रदूषण मुक्त ठेवण्याचा प्रयत्न
जालना- पूर्वी घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर यावर्षी जिल्हा प्रशासनाने संपूर्ण सतर्कता बाळगत पहाटेपासूनच परिस्थितीवर नियंत्रण ठेवले होते. शासकीय अधिकाऱ्यांनी वेळोवेळी विसर्जन ठिकाणाला भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांच्या मदतीला सामाजिक संस्था ही धावून आल्या होत्या, त्यामुळे दोघांच्या समन्वयाने जालना शहरासह जिल्हामध्ये कुठेही दुर्घटना घडली नाही. दरम्यान आज सकाळी नऊ वाजता शेवटच्या गणपतीचे विसर्जन मोती तलावात करण्यात आले.
जालना शहरातील मोती तलावात सर्वच गणपतीचे विसर्जन करण्यात आले. सकाळीच जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी मोती तलाव परिसराची पाहणी केली. त्या पाठोपाठ गणपती विसर्जन सुरू झाले. नगरपालिकेच्या वतीने दोन कृत्रिम हौदही तयार करण्यात आले होते. ज्यामध्ये घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यात आले. या ठिकाणी तहसीलदार श्रीकांत भुजबळ ,जालना नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर, सौद, संजय भालेराव, यांच्यासह कदिम जालना आणि चंदनजीरा पोलीस ठाण्याची हद्द असल्यामुळे कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सय्यद आणि चंदनजीरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन हे दोघेही जातीने हजर होते .सामाजिक संस्थांनी पुढे केलेल्या हाताला प्रशासकीय यंत्रणेने ही तेवढाच प्रतिसाद दिला आहे. आहे आणि हातात हात घालून मोती तलाव प्रदूषण मुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.
लहान घरगुती गणपतीचे विसर्जन मोती तलावात न करता पालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या कृत्रिम हौदामध्ये करण्यात आले. त्यानंतर या मूर्तींना विधिवत पद्धतीने शिरसवाडी परिसरातील खदानी मध्ये विसर्जित करण्यात आले. त्यामुळे मोती तलावातील निर्मल्यामूळे आणि अन्य साहित्यामुळे होणारे प्रदूषण थांबविण्यात यश मिळाले असल्याचा दावा सामाजिक संस्थांच्या वतीने करण्यात आला आहे.
दरम्यान सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या इनरव्हील क्लब ऑफ जालना सेंट्रल, माहेश्वरी महिला मंडळ, सृष्टी फाउंडेशन, ग्रीन आर्मी फाउंडेशन, अंजना फाउंडेशन, परिवर्तन सेवाभावी संस्था, रोटरी क्लब ऑफ जालना रेनबो अशा विविध संस्थांच्या माध्यमातून तसेच दानकुवर महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थिनींनी देखील इथे हजेरी लावून प्रशासनाला मदत केली.
*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com