Jalna Districtजालना जिल्हाराज्य

नेते मागतात उद्योजकांना भागीदारी- आम आदमी पार्टीचा आरोप

जालना- आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सात वर्षांपूर्वी जालन्यात येऊन गेले, आणि पुढे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे सभेला त्यांनी मार्गदर्शन केले.

असे असतानाही गेल्या सात वर्षापासून आम आदमी पक्षाला जालना जिल्ह्यात कोणत्याच निवडणुकीमध्ये खाते उघडता आले नाही. त्याच सोबत यावर्षी आम आदमी पार्टी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, या सर्व निवडणुका लढणार आहे. आणि सर्व ठिकाणी उमेदवार ही देणार आहे. निवडणुका नंतर बहुमत येणे शक्य नाही, मात्र जर काही उमेदवार निवडून आले तर ते कोणत्या पक्षासोबत जातील असाही असाही प्रश्न ईडीटीव्ही न्यूज च्या वतीने आम आदमी पार्टीचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांना विचारण्यात आला. या सर्व प्रश्नांना त्यांनी उत्तर दिली. त्याच सोबत स्थानिक प्रश्नांमध्ये लोकप्रतिनिधी हे औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या उद्योजकांना त्यांच्या उद्योगांमध्ये भागीदारी मागतात आणि त्यांना त्रास देतात असा आरोपही आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आला. परंतु या प्रश्नाचे उत्तर देताना कोण उद्योजक? आणि कोण लोकप्रतिनिधी? या दोघांचेही नाव घेण्याचे आम आदमी पार्टीचे पदाधिकारी तनुज बाहेती यांनी टाळले.


दरम्यान येथील परिसरात आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्ह्यातील आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला राज्य संयोजक रांगा राचुरे यांच्यासह राज्य सचिव धनंजय शिंदे ,सुग्रीव मुंडे, अनिल ढवळे ,सुभाष देठे, संजोग हिवाळे, समाधान खरात, तनुज बाहेती, योगेश गुल्लापेल्ली, रवी सूर्यवंशी, आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com

Related Articles