Jalna Districtजालना जिल्हाबाल विश्व

राम मूर्ती च्या तपासासाठी आ. गोरंट्याल यांचे उद्या ठिय्या आंदोलन

जालना- घनसावंगी तालुक्यातील रामदास स्वामी यांची जन्मभूमी असलेल्या जांब समर्थ येथील मंदिरातून पुरातन मूर्तीच्या झालेल्या चोरीचा तपास लावण्यात पोलिस प्रशासन अपयशी ठरले आहे.

या निषेधार्थ उद्या दि.१३ सप्टेंबर मंगळवार रोजी सकाळी ११वाजता काँग्रेस पक्षाच्या वतीने आ. कैलास गोरंटयाल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि सर्व माजी नगरसेवकांनी मोठया संख्येने सहभागी असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
घनसावंगी तालुक्यातील समर्थ रामदास स्वामी यांची जन्मभूमी असलेल्या मंदिरातून पुरातन मूर्तीची चोरी झाल्यानंतर आ.कैलास गोरंटयाल यांनी दि. १ सप्टेंबर रोजी जांब समर्थ येथे भेट देऊन मंदिरातून ४५० वर्षापूर्वीच्या पुरातन पंचधातूच्या मुर्तीची चोरी प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त करून या पुरातन मूर्ती चोरीचा तपास श्री विसर्जनापर्यंत लागला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा सदर भेटीच्या वेळी दिला होता. पुरातन मूर्ती चोरीच्या घटनेशी महाराष्ट्र राज्यासह देशातील तमाम भक्तांच्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत.त्यामुळे या चोरीच्या घटनेचा तपास तातडीने लावून चोरट्यांच्या छडा लावणे अपेक्षित असताना बराच कालावधी उलटूनही जिल्हा पोलिस प्रशासन या चोरीचा तपास लावण्यात  अपयशी ठरले आहे.या प्रकरणात केंद्रीय यंत्रणेद्वारे तपास करून आरोपीस लवकरात लवकर अटक करण्याची मागणी देखील आ.कैलास गोरंटयाल यांनी जांबसमर्थ येथे भेट दिल्यानंतर केली होती. केंद्रीय तपास यंत्रणेने देखील या गंभीर स्वरूपाच्या प्रकरणात लक्ष घातलेले नाही. सदर चोरीचा छडा त्वरित लावण्यात यावा यासाठी उद्या मंगळवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.

*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button