Jalna Districtजालना जिल्हाबाल विश्व

जि.प.शालेय विद्यार्थ्यांसाठी आणखी दोन उपक्रम

zp school

जालना-जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचाविण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने दोन उपक्रमांचा प्रयोग करण्यात येणार आहे. त्यामध्ये “अंतराळातील पुस्तक” आणि “महाराष्ट्रातून फेरफटका” या दोन पुस्तकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भौगोलिक आणि विज्ञानाची गोडी लागावी हा प्रयत्न केला जाणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिंदल यांच्या प्रयत्नातून हा प्रयोग साकार केला जातो आहे.

महाराष्ट्रातून फेरफटका या पुस्तकासोबत भिंतीवर अडकवता येईल अशा प्रकारचा कपड्यावर मोठ्या आकारात महाराष्ट्राचा नकाशा काढण्यात आला आहे. सापशिडीच्या खेळाप्रमाणे एखाद्या ठिकाणाहून जर महाराष्ट्राची भटकंती करायला सुरुवात केली तर रस्त्यामध्ये येणाऱ्या महत्त्वाच्या जिल्ह्यांची ओळख या माध्यमातून होते. महाराष्ट्रात भटकंती करत असताना साखर उद्योग कुठे आहे? गड किल्ले कुठे आहेत ?वीज निर्मिती केंद्र कुठे आहे? ऐतिहासिक स्थळे कुठे आहेत ?या सर्वांची थोडक्यात माहिती या नकाशाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गळी उतरविण्याचा प्रयत्न केला गेला आहे. जेणेकरून विद्यार्थी या ठिकाणांची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतील आणि त्यामधून ते अभ्यासाकडे वळतील.

“अंतराळातील पुस्तक” याच्यासोबतही भिंतीवर अडकविण्यासाठी कपड्यावर मोठ्या आकाराचा एक नकाशा आहे. त्यासोबत आपली सौरमालाही त्यांच्यासोबत देण्यात आली आहे. त्यामुळे कोणता ग्रह कुठे आहे ?ते कसे फिरतात हे विद्यार्थी स्वतः हाताळू शकतील. अशा प्रकारचा हा उपक्रम आहे. या नकाशावर चिटकविण्यासाठी वेगवेगळे ग्रह देखील कात्रण करून देण्यात आले आहेत. त्यासोबत तारे किती आहेत आणि ते कुठे कशा पद्धतीने आहेत हे देखील सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेमध्ये ही किट देण्यात येणार आहे त्यामुळे शाळेतील सर्व वर्गाच्या विद्यार्थ्यांना याचा अभ्यास करायला मिळणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिंदल यांनी या संदर्भात स्वतः ही माहिती दिली आहे. हा अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांना एक वेगळाच अनुभव येईल आणि या अनुभवातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक स्तर उंचावतील अशी आशा त्यांना आहे.

*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com

Related Articles