“आम्ही पेंग्विन सेना” तर तुम्ही” चित्ता पार्टी”- वरूण सरदेसाई

जालना-मुंबई महानगरपालिकेचे उत्पन्न वाढावे म्हणून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून प्राणीसंग्रहालयामध्ये पेंग्विन पक्षी आणले. हे पक्षी भारतामध्ये दुर्मिळ आहेत. या पक्षांना पाहण्यासाठी देश विदेशातील पर्यटक मुद्दामहून इथे येतात आणि त्याचा फायदा मुंबई महानगरपालिकेला झाला आहे. यामधून लाखो रुपयांचे उत्पन्न वाढले आहे. या उत्पन्नावर आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर भाजपाचा आणि बंडखोरी केलेल्या आमदारांचा डोळा आहे असा आरोप , युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी जालन्यात केला.
दरम्यान या पेंग्विन पक्षावरून भाजपवाले शिवसेनेला आता “पेंग्विन सेना” म्हणत आहेत. या उलट भाजपाने आठ चित्ते आणले आहेत हे चिते आणल्यामुळे शिवसेनेने देखील त्यांना आता “चिता पार्टी” म्हणावे ,असे आवाहन सरदेसाई यांनी केले आहे.
युवा सेनेच्या वतीने जालन्यामध्ये आज मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये ते बोलत होते. या मेळाव्याला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर, ए. जे. बोराडे, उपनेते लक्ष्मण वडले, यांच्यासह युवा सेनेचे समन्वयक भरत सांबरे ,महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सविता किवंडे, यांचीही यावेळी उपस्थिती होती.
सकाळी साडेदहा वाजता सुरू होणारा मिळावा दुपारी एक वाजता सुरू झाला. दरम्यानच्या काळात युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी चुळबुळ सुरू केली होती. परंतु त्याचवेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि उपनेते लक्ष्मण वडले हे आले आणि चुळबुळ शांत झाली. आठ दिवसांपूर्वीच शिवसेनेचा जिल्हा मेळावा झाला होता आणि त्यामध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सविस्तर भाषण केले होते त्यामुळे आज अवघ्या दोन मिनिटांमध्ये त्यांनी आपले भाषण आटोपते घेतले.
*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com