Jalna Districtजालना जिल्हाबाल विश्व

“अटल टिंकरिंग लॅब “चा विद्यार्थ्यांना होणार फायदा

शहरातील शाळेत प्रदर्शन

जालना -विद्यार्थ्यांच्या अंगातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळावी. या उद्देशाने केंद्र सरकारने काही ठराविक शाळांच्या मागणीनुसार अनुदान दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून श्री. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या जालना शहरातील श्री. सरस्वती भुवन प्रशालेला अनुदान मिळाले आहे, आणि या अनुदानातून विद्यार्थ्यांना प्रयोग करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी ही करण्यात आली आहे. खरेदी केलेल्या साहित्याचे आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रयोगाचे प्रदर्शन 17 सप्टेंबर रोजी भरवण्यात आले होते. केंद्र सरकारच्या या उपक्रमाला “अटल टिंकरिंग लॅब” असे नाव देण्यात आले आहे. या लॅब चे उद्घाटन उद्योजक जितेंद्र राठी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद येथील उद्योगपती प्रसाद कोकीळ, यांची उपस्थिती होती तर शालेय समितीचे अध्यक्ष सुनील रायठ रायठठा यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. प्रमुख उपस्थितीमध्ये शालेय समितीचे माजी अध्यक्ष कुमार देशपांडे, मुख्याध्यापक दिलीप महाजन ,उपमुख्याध्यापक रत्नाकर वाडेकर ,अटल लॅब चे प्रमुख विज्ञानाचे शिक्षक गिरीश देशमुख यांचीही उपस्थिती होती .दरम्यान यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध प्रयोग पाहून पाहुणे भारावून गेले. यामध्ये 20 प्रयोग ठेवण्यात आले होते आणि सुमारे 45 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.


अंध व्यक्तीला चालत असताना समोर काही अडथळा आला तर बझर वाजणारी काठी ,वजन उचलण्यासाठी चे जेसीबी मशीन, प्लास्टिक पासून वेगवेगळे डिझाईन तयार करण्याची सीएनसी मशीन, तसेच मोबाईल वरून ऑपरेट होणारे जेसीबी मशीन, अशा एक ना अनेक प्रयोगांची इथे रेलचेल होती. ही प्रयोगशाळा फक्त श्री सरस्वती भुवन प्रशालेच्या विद्यार्थ्यांसाठीच उपलब्ध आहे असे नव्हे तर शहरातील इतर शाळेचे विद्यार्थी देखील या प्रयोगशाळेचा फायदा घेऊ शकतात अशी माहितीही शाळेच्या वतीने देण्यात आले आहे.

*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button