गुरुजींनीच परीक्षेला बसविला बनावट विद्यार्थी;DYSP सुधीर खिरडकर यांच्यावर गुन्हा दाखल
जालना-जालन्याचे तत्कालीन वादग्रस्त उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी विधी सेवा परीक्षेला बनावट विद्यार्थी बसविला, आणि परीक्षाही पास करून घेतली. धाक-दपटशाही करून ही परीक्षा पास करून घेतली. परंतु मराठीतील एका म्हणीनुसार हा प्रकार उघडकीस आला. ती म्हण होती” मांजराने जरी दूध डोळे झाकून पिले तरी तिला जग पहात असते.” त्यानुसार श्री. खिरडकर यांच्या नावावर सोमनाथ मंडलीक यांनी ही परीक्षा दिली. दरम्यान लाच प्रकरणात खेडकर हे जालना येथून निलंबित झाले होते. आणि हे प्रकरण राज्यभर चांगलेच गाजले होते.
दिनांक 2 फेब्रुवारी 21 रोजी ऍड. रिमा संदीप खरात (काळे)यांनी विद्यापीठात तक्रार दिली आणि या तक्रारीमध्ये सोमनाथ सहदेव मंडलिक यांनी बनावट विद्यार्थी म्हणून परीक्षा दिली असल्याचे नमूद केले. याप्रकरणी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी डॉ. विलास खंदारे व्यवस्थापन परिषद सदस्य यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली या समितीमध्ये डॉ. दादासाहेब गजहंस डॉ. लक्ष्मण शिंदे यांचा समावेश होता. या समितीने दिनांक 4 फेब्रुवारी ते दिनांक 8 फेब्रुवारी2020 दरम्यान परीक्षार्थी सुधीर खिरडकर यांनी प्रवेशाच्या वेळी भरलेले अर्ज, आणि आत्ता दिलेली परीक्षा या दोन्हींची तपासणी केली. या तपासणीमध्ये परीक्षार्थी ची स्वाक्षरी, त्यांची उपस्थिती, हस्ताक्षर ,दोन ओळी मधील समास, या सर्व बाबींचा अभ्यास करून तसेच सोमनाथ सहदेव मंडलिक यांनी विद्यापीठाला लिहून दिलेल्या उत्तर,हे तपासले. सुधीर खिरडकर यांनी बनावट बनावट विद्यार्थी बसून विधी अभ्यासक्रमाची परीक्षा पास केल्याचे निदर्शनास आले आहे.
त्या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ चे अधिकारी गणेश रायभान मंझा, यांनी काल दिनांक 18 रोजी जालना तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी भारतीय दंड संहिता 417, 419, 34, अन्वये यातील आरोपी जालना येथील तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर अशोक खिरडकर आणि मुख्यालयात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असलेले सोमनाथ सहदेव मंडलिक या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
एका ॲट्रॉसिटी प्रकरणांमध्ये लाच घेताना सुधीर खेडकर यांना पकडले होते आणि त्या प्रकरणात देखील याच पोलीस हवालदाराचा बळी गेला होता तसेच सुधीर खिरडकर हे पोलीस प्रशासन सेवेत येण्यापूर्वी एक शिक्षक होते. त्यामुळे शिक्षकानेच केलेल्या या बनावट प्रकरणामुळे संताप व्यक्त केले जात आहे
*ऍड. रीमा खरात यांनी दिली होती तक्रार* औरंगाबाद येथे सौभाग्य हाउसिंग सोसायटी, सिडको भागात राहणाऱ्या ऍड. रीमा संदीप खरात यांनी विद्यापीठात तक्रार दिली होती. या तक्रारीत म्हटले होते की जालन्याचे उपविभागीय पोलीस सुधीर खिरडकर, हे बंदोबस्त कमी गोल्डन जुबली येथे कार्यरत असताना त्यांनी बनावट विद्यार्थी बसवून ही परीक्षा दिली. सन 2019- 20 या शैक्षणिक वर्षाची विधी अभ्यासक्रमाची प्रथम वर्षाची परीक्षा 4 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान घेण्यात आली. या परीक्षे दरम्यान सुधीर खिरडकर यांनी सोमनाथ सहदेव मंडलिक याला बनावट विद्यार्थी बसून परीक्षा पास करून घेतली आहे. याची चौकशी करावी अशी मागणी केली होती.
*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com