Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाबाल विश्वराज्य

जनप्रक्षोभ वाढत आहे, आता थांबविणे कठीण होईल- भूषण स्वामी

जालना-समर्थ रामदास स्वामींनी ज्या श्रीरामांच्या मूर्तीची पूजा केली, त्या मूर्तींची चोरी होऊन महिना लोटला आहे . पोलिसांना अद्याप तपास लागलेला नाही .दरम्यान मूर्ती चोरी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी राम भक्तांचा उद्रेक झाला असता ,मात्र पोलिसांनाही वेळ द्यायला हवा म्हणून सर्व राम भक्तांना शांत बसण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे राम भक्तांनी संयम ठेवला होता .मात्र आता महिना होऊनही मूर्तींचा तपास लागत नाही . आता जर राम भक्तांचा संयम सुटला तर त्याला आळा आळा घालणे कठीण होईल, असे मत समर्थ रामदास स्वामींचे वंशज भूषण स्वामी यांनी व्यक्त केले. Edtv news ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.

पुढे बोलताना भूषण स्वामी असेही म्हणाले की, “दुसऱ्या मूर्ती स्थापनेबाबत हस्ते पर हस्ते निरोपहि येत आहेत, मात्र या निरोपावर कदापिही विचार केल्या जाणार नाही. कारण राम भक्तांचा समर्थांवर विश्वास होता आणि समर्थांनी त्या मूर्तींची पूजा केलेली असल्यामुळे समर्थांचा त्या मूर्तींना स्पर्श झालेला होता. त्यामुळे त्या मूर्तींची किंमत अमुल्य आहे. या विषयावर कदापिही तडजोड केली जाणार नाही, आम्हाला त्याच मूर्ती हव्या आहेत पोलीस प्रशासनाला वेळ द्यायचा म्हणून महिनाभर वेळ दिला होता, मात्र अद्यापही तपास लागलेला नाही .यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी बोललो आहोत त्यांनी देखील विशेष तपास यंत्रणेमार्फत हा तपास सुरू केल्याचे सांगितले आहे. मात्र तपास कुठपर्यंत आला याचे मात्र अद्याप पर्यंत उत्तर मिळालेले नाही.

झालेली घटना आणि त्यानंतर आलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भक्तांनी देखील संयम ठेवला होता, मात्र आता ठीक- ठिकाणी पुढील दिशा ठरविण्यासंदर्भात बैठका होत आहेत. जनजागृती केली जात आहे. त्यामुळे आता जन प्रक्षोभ वाढायलाही सुरुवात होत आहे, आणि तो वाढल्यानंतर आटोक्यात आणणे कठीण जाईल असा इशाराही भूषण स्वामी यांनी edtv news ला दिलेल्या विशेष मुलाखतीच्या माध्यमातून प्रशासनाला दिला आहे.

*एम.डी. पोहनेरकर*
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com

 

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button