वडिलांच्या भोळसरपणाचा फायदा घेऊन मुलाचा काटा काढणाऱ्या काका सह चुलत भावाला जन्मठेपेची शिक्षा
वडील भोळसर असल्याचा फायदा घेऊन 3 वर्षीय मुलाचा दगडावर ठेचून काटा काढण्यात आला होता. काटा काढणाऱ्या या चुलत भाऊ आणि काकाला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.तसेच 80 हजार रुपये दंडही ठोठावला आहे आणि हा दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. त्याच सोबत या प्रकरणातील मृत मुलगा सक्षम मनोज जोडीवाले याच्या आईला 25 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेशही तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश के. एम. जैस्वाल यांनी आज दिले आहेत.
येथील गुरु गणेश भवन जैन शाळा येथे दिनांक एक जून 2016 रोजी अहिर गवळी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. या विवाह सोहळ्यात या प्रकरणातील तक्रारदार सक्षम ची आई राखी आणि आरोपी रामेश्वर चुडामन जोडीवाले वय 36, मुकेश चुडामन जोडीवाले वय 31, नीतू रामेश्वर जोडीवाले वय 30 आणि पवन आसाराम जोडीवाले व 29 हे सर्व ब्राह्मण गल्ली जाफराबाद येथील रहिवासी असून ते देखील या लग्नात सहभागी झाले होते. दरम्यान संध्याकाळच्या सुमारास या प्रकरणातील आरोपी पवन जोडीवाले यांनी सक्षम ला मोटरसायकल वर बसून विवाह सोहळ्यातून बाहेर नेले, सक्षम सापड सापडत नसल्यामुळे त्याच्या आईने रात्री अडीच वाजता मुलगा हरवल्याची तक्रार दिली. दरम्यान दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांना मंठा रोड येथील जीवनधारा धाब्याजवळ असलेल्या आबड यांच्या शेतात एका मुलाचा मृतदेह सापडला, आणि याची खात्री करण्यासाठी सक्षम च्या आईला बोलावले असता तो सक्षमच असल्याचे त्याच्या आईने सांगितले.
जोडीवाले परिवारात जाफराबाद येथे असलेल्या शेतीवरून वाद सुरू होते आणि सक्षम चे वडील भोळसर असल्याचा फायदा घेऊन या चौघांनीही सक्षम चा काटा काढला. तसेच मुलगाच नाही राहिला तर जमीन देण्याचा प्रश्नच येत नाही अशा धमक्याही ते सक्षमच्या परिवाराला देत होते.
सुरुवातीला हरवल्याची तक्रार दाखल झाली होती आणि त्यानंतर मृतदेह सापडल्यामुळे या प्रकरणात कलम वाढवून खुनाचे भादवी 302 हे कलम लावण्यात आले. पोलिसांनी तपास करून या चारही आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्या दरम्यान न्यायालयाने जैन शाळेतील सीसीटीव्ही फुटेज, सक्षम च्या प्रेताजवळ सापडलेला 25 किलो वजनाचा दगड, दगडावर व आरोपी मुकेश याच्या कपड्यावर सापडलेले रक्त आणि हे मानवी रक्त असल्याचा आलेला प्रयोगशाळेचा अहवाल या सर्व बाबी तपासल्यानंतर हा निर्णय दिला आहे .सरकारतर्फे एकूण 13 साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये मृत मुलाची आई राखी मनोज जोडीवाले, बिलाल अहमद, राम श्रीकांत जाधव, नोडल ऑफिसर दत्तात्रय आंग्रे, विजय आंबट, रोहित लालझरे, रुपेश चव्हाण, मयताचे शवविच्छेदन करणारे डॉक्टर राजेश शेजुळ, दादासाहेब हरणे, तपासी अमलदार साईनाथ ठोंबरे, संदीप वसावे, मयताचे आजोबा प्रफुल्ल पहाडीये, यांचा समावेश होता. तक्रारदारा तर्फे सरकार पक्षाला मदत म्हणून एडवोकेट अश्विनी मते यांनी सहाय्यक सरकारी तथा अतिरिक्त सरकारी वकील वर्षामुखीम यांना मदत केली.
*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com