Jalna Districtजालना जिल्हा

नेत्यांच्या आंदोलनाने न सुटलेल्या प्रश्नासाठी आता व्यापारी आणि जनता रस्त्यावर

 

जालना -शहरातील एक महत्त्वाचा रस्ता म्हणजे कादराबाद भाग. जुन्या जालन्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याकडे जाण्यासाठी हा महत्त्वाचा रस्ता. या रस्त्यावरून शाळकरी विद्यार्थी, बँक कर्मचारी, व्यापारी, यांची वर्दळ असते. याच परिसरात दर आठवड्याला भरणारा मंगळवारचा बाजारही आहे. असे असतानाही गेल्या दोन वर्षांपासून हा रस्ता बंद आहे. यासंदर्भात माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनीही आंदोलन केले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनीही आंदोलन केले. मात्र पालिकेने नेहमीप्रमाणे लेखी आश्वासन देऊन त्यांना आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले. आता व्यापारी आणि जनता रस्त्यावर उतरली आहे आणि हा रस्ता सुरळीत न झाल्यास जालना बंदची ही हाक देण्यात आली आहे.

 

जालना शहरात काही निजामकालीन वास्तू आहेत त्यापैकीच ही “मूर्तीवेस”. जालना शहरातून सिंदखेड राजाकडे जाताना देवमूर्ती हे गाव लागते आणि या गावाला जाण्यासाठी या वेसेमधून मधून जावे लागायचे म्हणून या वास्तूला मूर्ती वेस असे नाव पडले. दोन वर्षांपूर्वी सततच्या पावसामुळे या वास्तूचा काही भाग कोसळला आणि दुसऱ्या दिवशी पासून हा रस्ता बंद करण्यात आला, तो आजही बंदच आहे .ही वास्तू निजामकालीन असल्यामुळे याची मालकी व वक्फ बोर्डाकडे आहे आणि हद्द नगरपालिकेची आहे. त्यामुळे सुरुवातीला ही वेस दुरुस्त करण्यासाठी खर्च करायचा कोणी? यावर बरेच मंथन झाले व वक्फ बोर्डाचे म्हणणे होते की जागा पालिकेचे आहे वापर पालिकेचा आहे, खर्च पालिकेने करावा आणि त्यांनी वेस दुरुस्तीसाठी ना हरकत प्रमाणपत्र देऊन मोकळे झाले.

मात्र मालमत्ता ही वक्फ बोर्डाची आहे त्यामुळे ती पालिकेने का दुरुस्त करावी? असाही प्रश्न ऐरणीवर आला होता. यामधून तोडगा काढत शेवटी नगरपालिकेने वेस दुरुस्तीची निविदा काढली. सुरुवातीला कोणी कंत्राटदारच ही निविदा घेण्यास तयार नव्हते. माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी आंदोलन केल्यानंतर तत्कालीन मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी महिनाभरात वेशीची दुरुस्ती होऊन रस्ता सुरळीत होईल असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र ते पूर्ण झालेच नाही त्यामुळे पुन्हा आंदोलन झाले आणि पुन्हा निविदा निघाली. यावेळी निविदा तर विकल्या गेली मात्र तिचे कामच सुरू झाले नाही. पुन्हा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी आंदोलन केले आणि पावसाळा सुरू आहे असे म्हणत पुन्हा खोडा घालण्यात आला मात्र. आता सर्व जालनेकर संतापलेले आहेत आणि केवळ हा रस्ता बंद असल्यामुळे सर्वांना सुमारे तीन किलोमीटरचा नाहक गर्दीतून प्रवास करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकाकडे जावे लागत आहे. त्यामुळे आता या परिसरातील वैतागलेले नागरिक व्यापारी व्यावसायिक यांनी 26 तारखेपर्यंत हा रस्ता सुरू न झाल्यास 27 तारखेला जालना बंदची हाक दिली आहे.

*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button