Jalna Districtजालना जिल्हा

शेतकऱ्यांचे पिक विम्यासाठी सरकार दरबारी लोटांगण

बदनापूर- तालुक्यातील दाभाडी मंडळातील डाळिंब मोसंबी यासह फळबागांना पीक विमा मिळावा आणि तालुक्याचा अतिवृष्टी मध्ये समावेश करून नुकसान भरपाई देण्यात यावी. या मागणीसाठी बदनापूर तालुक्यातील शेतकरी वारंवार तहसीलमध्ये चकरा मारत आहेत. विशेष करून दाभाडी सर्कल मधील शेतकऱ्यांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. सुरुवातीला दाभाडी येथे रास्ता रोको त्यानंतर बदनापूर येथील तहसील कार्यालयात तहसीलदारांना निवेदन देऊन कांही शेतकऱ्यांनी स्वतःला गाढूनही घेतले होते. तरीदेखील काहीच उपयोग झाला नाही त्यामुळे शेवटी आज शेतकऱ्यांनी चक्क लोटांगण आंदोलन हाती घेतले. बदनापूर येथे सुरू असलेले हे आंदोलन पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी मागे घेण्यास आवाहन केले, परंतु शेतकरी ऐकण्यासाठी तयार नसल्यामुळे त्यांना जिल्हाधिकाऱ्यांकडे कैफियत मांडण्यासाठी पाठवले.

दरम्यान जालना शहरात एका खाजगी बसने हे सर्व शेतकरी आले आणि कार्यालयाच्या समोरच रस्त्यावर लोटांगण घेणे सुरू केले. 26 तारखेपर्यंत जर शेतकऱ्यांना पीक विम्याचे अनुदान मिळाले नाही तर पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दाभाडी मंडळातील शेतकऱ्यांनी दिला आहे. आज या आंदोलनात कारभारी मसलेकर. भानुदास घुगे, लक्ष्मण मसलेकर ,भरत सांबरे, यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते.

*एम.डी. पोहनेरकर*
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button