Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

खुशखबर ;कोणताही चित्रपट पहा फक्त 75 रुपयात

only 75₹

जालना- चित्रपट रसिकांसाठी एक दिवसाची का होईना खुशखबर आहे. भारतात पहिल्यांदाच आणि पहिलाच” राष्ट्रीय चित्रपट दिवस , 23 सप्टेंबर” हा पाळल्या जाणार आहे. त्या अनुषंगाने चित्रपट रसिकांना केवळ फक्त 75 रुपयात दिवसभरातील कोणताही चित्रपट, कोणत्याही चित्रपट गृहांमध्ये पाहायला मिळणार आहे.


जालना शहरात रत्नदीप चित्रपट गृहामध्ये “ब्रह्मास्त्र” हा अमिताभ बच्चन चा चित्रपट सध्या सुरू आहे, आणि उद्या या चित्रपट दिनाच्या निमित्ताने इथे देखील फक्त 75 रुपयात कोणत्याही वर्गाचे तिकीट उपलब्ध आहे. जो पहिला येईल त्याला प्राधान्य ,या पद्धतीने प्रेक्षक ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही पद्धतीने बुकिंग करू शकतात.

भारतीय सिनेमा घरांचे एक असोसिएशन आहे हे असोसिएशन चित्रपटगृहचालक आणि प्रेक्षक यांच्यामध्ये समन्वय ठेवण्याचे काम करते .या संस्थेला एम. ए .आय .असे म्हणतात. त्या संस्थेने हा निर्णय घेतला आहे. यापुढे प्रत्येक वर्षी 23 सप्टेंबर हा दिवस” राष्ट्रीय चित्रपट” दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे .अशा प्रकारचा चित्रपट दिवस अमेरिकेतही साजरा केला जातो आणि तो 3 सप्टेंबर रोजी असतो .त्याच धर्तीवर आता भारतातही हा दिवस साजरा केला जाणार आहे. या दिनाच्या निमित्ताने चित्रपट रसिकांना पर्वणीच मिळणार आहे. रत्नदीप सिनेमा मध्ये सकाळच्या वेळी “बॉईज थ्री”, तर दुपारनंतर “ब्रम्हास्त्र” या चित्रपटाचे प्रदर्शन सुरू आहे .ब्रम्हास्त्र हा चित्रपट थ्रीडी जरी असला तरी त्याचेही तिकीट केवळ 75 रुपये असल्यामुळे प्रेक्षकांना याचा फायदा घ्यावा असे आवाहन रत्नदीप चित्रपटगृहाचे मालक विनोद अग्रवाल यांनी केले आहे.

*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button