Jalna Districtजालना जिल्हाराज्य

नवीन उद्योग सुरू करायचा ? का आहे तो वाढवायचा ?-मग ही बातमी वाचा

जालना-स्टार्टअप्स इकोसिस्टीम विकसित करण्यासाठी कार्यरत असलेल्या मॅजिक या सीएमआयए सदस्यांनी पुढाकार घेऊन स्थापन केलेल्या इंक्यूबेटरच्या प्रयत्नांना मोठे यश आले असून, नुकतेच केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या स्टार्टअप इंडिया सीड फंड या योजनेमध्ये मॅजिकचा समावेश करण्यात आला आहे. या बाबतची अधिकृत घोषणा केंद्रीय उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने नुकतीच केली आहे. स्टार्टअप इंडिया देशभरातील नोंदणीकृत नवउद्योजकांना या योजनेअंतर्गत बीज भांडवलाच्या माध्यमातून मदत केली जाणार असल्याची माहिती मॅजिक संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे. स्टार्टअप इंडिया सीड फंड योजनेत समावेश झालेली मॅजिक मराठवाड्यातील पहिली संस्था असून, देशातील स्टार्टअप इंडिया सीड फंड देणाऱ्या निवडक इन्क्युबेटरमध्ये मॅजिकचा समावेश झाला आहे. मॅजिक इनक्यूबेटर सीड फंड कमिटी (एमआयएसएफसी) ज्यामध्ये प्रमुख मार्गदर्शक, नामवंत उद्योजक आणि गुंतवणूकदार यांचा समावेश आहे, ज्यांचे आवश्यक बीज भांडवलाचे (Seed Fund) मूल्यांकन करण्यासाठी आणि स्टार्टअप्सची निवड करण्यासाठी मॅजिकने स्थापन केली आहे.

स्टार्टअप इंडिया सीड फंड योजना (SISFS) स्टार्टअप्सना संकल्पनेच्या पुराव्यासाठी, प्रोटोटाइप विकसित करण्यासाठी, उत्पादनाच्या चाचण्या घेण्यासाठी, मार्केट एंट्री आणि शाश्वत व्यवसायात रुपांतर करण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करण्याच्या उद्दिष्टाने स्थापन करण्यात आली आहे. या योजनेचा थेट फायदा नवीन स्टार्टअप्सना आपला व्यवसाय वाढविण्यासाठी होऊन, स्टार्टअप्स पुढील टप्प्यामध्ये गुंतवणूकदार, व्हीसी, भांडवलदार, व्यावसायिक बँका किंवा वित्तीय संस्थांकडून यांच्याकडून अर्थसहाय्य प्राप्त करू शकतील.

या विषयी माहिती देतांना मॅजिक इनक्यूबेटर सीड फंड कमिटीचे अध्यक्ष आणि मॅजिकचे संचालक मुकुंद भोगले म्हणाले कि,  स्टार्टअपना सुरुवातीच्या टप्प्यावर मोठ्या भांडवलीची आवश्यकता असते, सगळ्यांकडेच स्टार्टअप सुरु करण्यासाठी पैसे असतीलच असं नाही, त्यामुळे अनेक वेळेस चांगली कल्पना असून ते त्या स्टार्टअप्सचे रुपांतर मोठ्या उद्योगात करू शकत नाही.  गुंतवणूकदार आणि उद्यम भांडवल संस्थांकडून स्टार्टअपसाठी निधी प्राप्त करण्यासाठी मोठी आणि जटील प्रक्रिया आहे, त्याचप्रमाणे, बँका केवळ मालमत्ता-समर्थित अर्जदारांनाच कर्ज देतात. याचा विचार करून केंद्र सरकारने नवउद्योजकांसाठी सीड फंड योजना सुरु केली असून, देशातील काही निवडक इन्क्युबेटरच्या माध्यमातून हा निधी स्टार्टअप्सना दिला जातो. मॅजिकचा योजनेत समावेश झाल्यामुळे मराठवाड्यासह देशातील स्टार्टअप्स या योजनेकरिता मॅजिकच्या माध्यमातून अर्ज करू शकतील.

मॅजिकचे संचालक सुनील रायठ्ठा म्हणाले की, आपल्या नवनवीन संकल्पनेसोबत देशात नवउद्योजक मोठ्या प्रमाणावर समोर येत आहे. स्टार्टअप्सच्या बाबतीत जगातील पहिल्या तीन देशात भारताचा समावेश झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये औरंगाबाद, जालना आणि मराठवाडा विभागातून अनेक स्टार्टअप्सनी मोठ्या प्रमाणावर यश संपादन केले आहे. या नवउद्योजकांना आपला व्यवसायात प्रगती करण्यासाठी ही योजना महत्वपूर्ण ठरू शकते, विभागातील जास्तीत जास्त नवउद्योजकानी या संधीचा फायदा घ्यावा.

*स्टार्टअप इंडिया सीड फंड योजनेमध्ये कोण अर्ज करू शकतील?*
• या योजनेमधून निधी प्राप्त करण्यासाठी स्टार्टअप डीपीआयआयटीकडून मान्यताप्राप्त असणे गरजेचे आहे.
• आवेदनाच्या वेळी स्टार्टअपची सुरुवात दोन वर्षापेक्षा आधी सुरू झालेली नसावी.
• स्टार्टअपकडे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसच्या विकासासाठी बिझनेस आयडिया असणे गरजेचे आहे.
•आपल्या कोर प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस किंवा बिझनेस, डिस्ट्रिब्युशन मॉडलसाठी तंत्रज्ञानाचा आधार घेणाऱ्या वेस्ट मॅनेजमेंट, सोशल इम्पॅक्ट, जल व्यवस्थापन, शिक्षण, कृषी, खाद्य प्रसंस्करण, बायो टेक्नोलॉजी, हेल्थ केअर, ऊर्जा, मोबिलिटी, डिफेन्स, स्पेस, रेल्वे, तेल, गॅस, टेक्सटाइल आदी क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपाय  प्रदान करणऱ्या स्टार्टअप्सना निधी मिळण्यासाठी प्राधान्य असणार आहे.
• स्टार्टअपद्वारे कोणत्याही केंद्र किंवा राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत दहा लाख रुपये किंवा यापेक्षा अधिकची मदत घेतलेली नसावी.
• स्टार्टअपमध्ये भारतीय भागधारकाचा हिस्सा आवेदनाच्या वेळी किमान ५१ टक्के असणे अनिवार्य आहे.
• कोणत्याही स्टार्टअपला एकापेक्षा अधिक सीड सपोर्ट दिला जाणार नाही.
• पात्र स्टार्टअपला इन्क्युबेटर्सच्या माध्यमातून २० लाख रुपयांपर्यंत अनुदान किंवा ५० लाख रुपयापर्यंत गहाणविरहित कर्ज प्राप्त केले जाऊ शकते.**********

*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button