Jalna Districtजालना जिल्हा

समृद्धी शुगरच्या वतीने दहा हजार लंपी लसचे वाटप

घनसावंगी- घनसावंगी तालुका हा ग्रामीण भाग म्हणून ओळखला जातो. या तालुक्यामध्ये पशुधनही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे लंपी या आजाराची लागण ही मोठ्या प्रमाणात झाली आहे. याला आळा घालण्यासाठी पशुपालक कसोशीने प्रयत्न करीत आहेत .त्यांच्या या प्रयत्नांना मदत म्हणून देवी दहेगाव येथे असलेल्या समृद्धी शुगर लिमिटेड च्या वतीने या आजाराच्या दहा हजार लस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

आत्तापर्यंत सुमारे 3000 लस या जनावरांना टोचण्यात आहेत तर उर्वरित लस टोचण्याचे कामही ठिकठिकाणी चालू आहे. ग्रामीण भागामध्ये सर्वत्र या लस देतानाचे चित्र दिसायला लागले आहे. सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम उढाण हे देखील या उपक्रमामध्ये सहभागी झाले आहेत, आणि त्यांची देखील मदत शेतकऱ्यांना होत आहे. त्याबद्दल शेतकऱ्यांच्या वतीने उढाण यांचाही सत्कार करण्यात आला आहे. तालुक्यातील मुरमा आणि कोठी या दोन गावांमध्ये प्रत्येकी 300 लस देण्यात आल्या आहेत.

*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com

Related Articles