Jalna Districtजालना जिल्हा

एटीएसने पकडलेल्या कार्यकर्त्याला सोडा; पॉपुलर संघटनेची निदर्शने

जालना -दहशतवादी विरोधी पथकाने परवा मध्यरात्री जालना शहरातील पॉपुलर फ्रंट चे कार्यकर्ते अब्दुल हदी यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान या घटनेचा निषेध म्हणून आज दुपारी नमाज नंतर जालना शहरातील मामा चौकात या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करून घोषणाबाजी केली.

निदर्शनाला पोलिसांची परवानगी नसल्यामुळे दहा मिनिटातच ही निदर्शने अटोपती घेण्यात आली. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. पॉपुलर फ्रंट चे जिल्हाध्यक्ष शेख उमेर यांनी सांगितले की, परवा मध्यरात्री साडेतीन वाजेच्या सुमारास एटीएसच्या पथकाने या संघटनेचे कार्यकर्ते अब्दुल हदी यांना उचलून नेले आहे. या संदर्भात कोणतीही सूचना त्यांच्या परिवाराला किंवा संघटनेला दिल्या गेली नाही. हा संघटनेवर आणि परिवारावर अन्याय आहे. पदाधिकारी अब्दुल हदी यांना सोडून देण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button