Jalna Districtजालना जिल्हाराज्य

पॉपुलर फ्रंट च्या आठ कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल

जालना- पॉपुलर फ्रंटचा कार्यकर्ता अब्दुल हदी याला दोन दिवसांपूर्वी एटीएसच्या पथकाने जळगाव येथून ताब्यात घेतले होते. अधिक माहितीसाठी त्याला जालना येथील रहमानगंज भागात असलेल्या त्याच्या घरी शुक्रवार दिनांक 23 रोजी दुपारी साडेतीन वाजता आणण्यात आले होते. दरम्यान या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एन. आय. ए. व ए.टी.एस. या दोन्ही तपास यंत्रणेच्या विरोधात घोषणाबाजी करून मुर्दाबाद च्या घोषणा दिल्या. पोलिसांनी त्यांना मज्जाव केला असता तेथून परत जाण्याच्या मनस्थितीत हे कार्यकर्ते नव्हते. त्यामुळे सौम्य लाठीमार करावा लागला होता. सरकारी कामात अडथळा आणल्याच्या कारणावरून तसेच जिल्हाधिकारी यांचे कलम 37 चे उल्लंघन केल्याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात आठ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

यामध्ये गांधीनगर भागात राहणाऱ्या शेख उमर हबीब, परवेज मुक्रम खान, रहमान गंज मध्ये राहणाऱ्या जमशेद आयुब पठाण, मोहम्मद आदिल, अत्तर शेख जुनेद शेख ,जिलानी सय्यद सादात सय्यद मुजीब, शेख फईजान अजीम आणि समीर शेख अनवर यांचा समावेश आहे.

*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button