“42 वे मराठवाडा साहित्य संमेलन” डिसेंबर मध्ये
जालना- चालू वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात साहित्यरसिकांसाठी मेजवानी आहे. दिनांक 10 व 11 डिसेंबर रोजी घनसावंगी येथे” 42 वे मराठवाडा साहित्य संमेलन” आयोजित करण्यात आले आहे. या संदर्भातील माहिती या संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान स्वामी रामानंद शिक्षण प्रसारक मंडळाला 25 वर्षे पूर्ण झाले आहेत . रोप्य महोत्सवानिमित्त साहित्य क्षेत्रातील मानाचा समजला जाणारे हे साहित्य संमेलन आहे.
या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर, उपजिल्हाप्रमुख हनुमान धांडे ,संस्थेचे प्राचार्य आर. के. परदेशी, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. संभाजी चोथे यांची उपस्थिती होती.
दरम्यान पुढे बोलताना स्वागताध्यक्ष शिवाजीराव चोथे म्हणाले की, अंबड आणि घनसांगी तालुक्याला प्राचीन काळापासून साहित्य आणि संस्कृतीचा वारसा आहे, सुमारे एक हजार वर्षांपूर्वी साहित्याची समृद्ध परंपरा लाभलेल्या महदंबा, तसेच समर्थ रामदास स्वामी ,स्वामी रामानंद ,श्री विज्ञानेश्वर यांची ही भूमी आहे. त्यांच्या या भूमीत साहित्याच्या जागर करावा हा या मागचा उद्देश आहे. दिनांक 10 व 11 डिसेंबर 2022 रोजी घनसावंगी येथील संत रामदास महाविद्यालयाच्या प्रांगणात दोन दिवसीय “42 वे मराठवाडा साहित्य संमेलन” पार पडणार आहे. या संमेलनासाठी मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले, उपाध्यक्ष किरण सगर, हे उपस्थित राहणार आहेत. सर्व समाजाचा आणि सर्व साहित्याचा समावेश असलेल्या या साहित्य संमेलनामध्ये, राजकीय परिसंवाद देखील घडवून आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही शिवाजीराव चोथे यांनी सांगितले. दरम्यान उद्घाटक आणि समारोपाचे अध्यक्ष यांच्या अजून तारखा मिळाल्या नाहीत त्या मिळतात निमंत्रण पत्रिका तयार केली जाईल असेही ते म्हणाले.
*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com