Jalna Districtजालना जिल्हाराज्य

जुन्या पेन्शन साठी मराठवाडा शिक्षक संघाचा मोर्चा

जालना -अंशदायी पेन्शन योजना रद्द करून सर्वांनाच जुनी पेन्शन योजना लागू करावी ,या प्रमुख मागणीसह अन्य 22 मागण्यांसाठी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने आज मोर्चा काढण्यात आला. गांधी चमन येथून दुपारी बारा वाजेच्या सुमारास या मोर्चाला सुरुवात झाली, आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला.

दरम्यान गांधी चमन येथे जिल्ह्यातील बहुतांश शिक्षक हजर झाले होते. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जिल्ह्यामध्ये सुमारे 3000 च्या जवळपास संख्या आहे .या मोर्चामध्ये मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश आंधळे, जिल्हा सचिव संजय येळवंते, उपाध्यक्ष जगन वाघमोडे ,ज्ञानोबा वरवटे, नारायण मुंडे, गौतम बनसोडे ,प्राध्यापक डॉ. मारुती तेगंपुरे, यांच्यासह अनेक अनेक शिक्षक सहभागी झाले होते.


*या आहेत प्रमुख मागण्या*एकूण 23 मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. त्यापैकी काही प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे अंशदायी पेन्शन योजना रद्द करून सर्वांनाच जुनी पेन्शन योजना लागू करावी.* तासिका तत्त्वावर अल्प मानधनावर कार्यरत असलेल्या प्राध्यापकांना नियमित प्राध्यापक म्हणून मान्यता देण्यात यावी.* राज्यातील शिक्षकांना 10, 20, 30 अशा तीन लाभांची आश्वासित प्रगती योजना लागू करावी.* शिक्षक पाल्यांना विहित दराने अर्थसाहाय्य करणारा 16 मार्च 2021 चा शासन आदेश रद्द करून सर्वच स्तरावरील मोफत शिक्षणाचा शासन आदेश लागू करावा .* सर्वच शैक्षणिक संस्थांचे वेतनेतर अनुदान सातव्या वेतन आयोगानुसार देण्यात यावे.* सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना वैद्यकीय प्रतिकृती योजना लागू करावी.* शिक्षक, कर्मचारी यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्यात यावे.* या आणि अन्य मागण्यांचा यामध्ये समावेश आहे.

दरम्यान गांधी चमन येथे जिल्ह्यातील बहुतांश शिक्षक हजर झाले होते. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जिल्ह्यामध्ये सुमारे 3000 च्या जवळपास संख्या आहे .या मोर्चामध्ये मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश आंधळे, जिल्हा सचिव संजय येळवंते, उपाध्यक्ष जगन वाघमोडे ,ज्ञानोबा वरवटे, नारायण मुंडे, गौतम बनसोडे ,प्राध्यापक डॉ. मारुती तेगंपुरे, यांच्यासह अनेक अनेक शिक्षक सहभागी झाले होते.
*या आहेत प्रमुख मागण्या*

एकूण 23 मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. त्यापैकी काही प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे अंशदायी पेन्शन योजना रद्द करून सर्वांनाच जुनी पेन्शन योजना लागू करावी.* तासिका तत्त्वावर अल्प मानधनावर कार्यरत असलेल्या प्राध्यापकांना नियमित प्राध्यापक म्हणून मान्यता देण्यात यावी.* राज्यातील शिक्षकांना 10, 20, 30 अशा तीन लाभांची आश्वासित प्रगती योजना लागू करावी.* शिक्षक पाल्यांना विहित दराने अर्थसाहाय्य करणारा 16 मार्च 2021 चा शासन आदेश रद्द करून सर्वच स्तरावरील मोफत शिक्षणाचा शासन आदेश लागू करावा .* सर्वच शैक्षणिक संस्थांचे वेतनेतर अनुदान सातव्या वेतन आयोगानुसार देण्यात यावे.* सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना वैद्यकीय प्रतिकृती योजना लागू करावी.* शिक्षक, कर्मचारी यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्यात यावे.* या आणि अन्य मागण्यांचा यामध्ये समावेश आहे.***

एम.डी. पोहनेरकर 8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com

Related Articles