नागरिकांचे लक्ष वेधत आहे” दुर्गा दौड”
सध्या नवरात्रोत्सवाची सर्वत्र धूम सुरू आहे. विविध उपक्रमही हाती घेतले जात आहेत. असाच एक उपक्रम सध्या शहरात सुरू आहे आणि पुढील नऊ दिवस चालणार आहे, तो उपक्रम म्हणजे सकल हिंदू समाजाच्या वतीने दररोज काढण्यात येणारी ” दुर्गादौड.”
या दौड चे वैशिष्ट्य म्हणजे रोज पहाटे युवतींची लक्षणीय संख्या असलेली ही दौड शहरातील विविध मंदिरांपासून विविध मंदिरापर्यंत निघत आहे. दरम्यान नवीन वस्तीमध्ये ही दौड जात असल्यामुळे ठीक ठिकाणी या दौडचे स्वागत होत आहे. विशेष करून दौडच्या अग्रभागी असलेल्या प्रतिकात्मक भारत मातेचे पूजन आणि औक्षवणही केल्या जात आहे. दौंड चे स्वागत करण्यासाठी सडा रांगोळी ही केल्या जात आहे.विविध घोषणांमुळे पहाटेच्या वेळी नागरिक कौतुकांनी घराच्या बाहेर येऊन ही दौड पाहत आहेत .दरम्यान पाश्चात्त्य संस्कृतीचे अतिक्रमण हटवून हिंदू संस्कृती जपण्यासाठी ती पुन्हा रुजवण्यासाठी तसेच प्रत्येकाच्या मनामध्ये हिंदुत्वाची ज्योत तेवत ठेवण्यासाठी ही दौड आयोजित करण्यात आली आहे. विशेष करून युवतींनी स्वावलंबी व्हावे हा देखील या मागचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. काल घटस्थापनेच्या दिवशी पहाटेच नवीन जालन्यातील भारत माता मंदिरापासून ही दौड निघाली होती. आज दुसऱ्या दिवशी जालना शहरातील मस्तगड भागात असलेल्या श्री शितला माता मंदिरापासून ही दौड निघाली. लक्ष्मीनारायण पुरा मार्गे मस्तगड आणि कुलस्वामिनी तुळजाभवाच्या मळ्यातील मंदिरामध्ये या दौडचा समारोप करण्यात आला.
उद्या बुधवारी पहाटे सहा वाजता ही दुर्गा दौड मोतीबागे जवळ असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून निघणार आहे. या दौडमध्ये जगदीश गौड, जगन्नाथ कातारे ,राहुल यादव, अर्जुन डहाळे, वेणूगोपाल झंवर, मयुरी नावडकर, गौरी लोंढे, आयुषी हिरासकर, अंजली ढोबळे, आदी युवतींनी सहभाग घेतला आहे.
एम.डी. पोहनेरकर 8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com