मुले पळवणारी टोळी आल्याची अफवा; भोकरदन शहरात खळबळ
जालना- जालना जिल्ह्यामध्ये सध्या मुले पळवणारी टोळी आली आहे. या अफवेचे पेव फुटलेले आहेत. पोलीस प्रशासन वारंवार ही अफवा असल्याचा निर्वाळा देत आहे मात्र जनता काही यावर विश्वास ठेवायला तयार नाही. याच आफवेतून बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास भोकरदन शहरात चांगलीच खळबळ उडाली होती.
त्याचे झाले असे की भोकरदन सिल्लोड रस्त्यावर एका चार चाकी वाहनाने दुचाकी वरील अकरा वर्षाच्या मुलाला ठोस दिली. आणि वाहन पळून गेले .रात्री साडेआठ वाजता हा अपघात झाला. अपघातातील चार चाकी वाहन पळून जाण्याच्या तयारीत असतानाच हा अपघात बघणाऱ्यांनी या वाहनाचा पाठलाग केला आणि मुठाळ पाटी जवळ पोलिसांच्या मदतीने त्याला पकडले. हे वाहन पकडे पर्यंत भोकरदन शहरात मुले पळवणारी टोळी आल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली आणि जनता रस्त्यावर आली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. हा जमाव पोलीस ठाण्याच्या बाहेरही जमला होता .दरम्यान पोलिसांनी या सर्व प्रकरणाची चौकशी केली आणि हा केवळ अपघात आहे ,मुले पळवणाऱ्या टोळीचा काहीही संबंध नाही असे स्पष्टीकरण दिले. त्याच सोबत भोकरदन शहरात गस्त घालून अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले. त्यामुळे काही काळ खळबळ उडालेल्या भोकरदन शहरात नंतर शांतता पसरली .या दुचाकीच्या अपघातात एक अकरा वर्षाचा मुलगा आणि अन्य एक जण जखमी झाले आहेत.
एम.डी. पोहनेरकर 8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com