दुसऱ्या देवीचा मान सन्मान करणारी देवी दहेगाव ची रेणुका माता
घनसावंगी( बाबासाहेब ढेरे)- दैनंदिन जीवन जगताना जीवाची होणारी घालमेल थांबवून मन शांत करायचा असेल तर देवी दहेगाव येथे असलेल्या रेणुका मातेचे ठिकाण निवडायला हरकत नाही. उंच टेकडीवर आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे रेणुका मातेचे संस्थान आहे. सुमारे आठ पिढ्यापूर्वीच आणि पाचशे वर्षांपूर्वीच्या या मंदिराचा सत्य परिस्थिती कुठेही सविस्तर उल्लेख पहावयास मिळत नाही अशी माहिती मंदिराचे व्यवस्थापक व्यवस्थापक सुभाषराव कुलकर्णी यांनी दिली.
डोंगर माथ्यावर असलेलं हे संस्थान भव्य दिव्य परिसरामध्ये आहे, मंदिराच्या पायथ्याशीच पुरातन बाराव म्हणजेच कल्लोळ आहे. या कल्लोळामध्ये बाराही महिने मुबलक प्रमाणात पाणी असते. आजही हा कल्लोळ पाण्याने पूर्णपणे भरून वाहत आहे. मंदिर तसं पुरातनच आहे. गाभाऱ्या मधील शांत आणि थकलेल्या जीवाला थंड हवा देऊन शांत करणारी झाडे आणि या शांततेमध्ये पक्षांच्या किलबिलाटाने वातावरण प्रसन्न होऊन जाते.
उन्हाळ्यामध्ये इथे जत्रा ही भरते. या देवीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरापासूनच जवळच बोडखा ग्रामस्थांची शिळादेवी ही देवता आहे. जी रेणुका मातेचे स्वरूप आहे. नवरात्रत रेणुका मातेची आरती या शिलादेवीला घेऊन जातात आणि उन्हाळ्यामध्ये ज्यावेळी रेणुका मातेची जत्रा भरते त्यावेळी शिळादेवीचे पातळ (लुगडे, किंवा साडी) रेणुका मातेला येते अशी ही मानपाण्याची पद्धत आहे. सध्या नवरात्र सुरू आहेत आणि देवी दहेगाव च्या मंदिरात धार्मिक उत्सवांची रेलचेल आहे. तिन्ही त्रिकाल आरती, दुपारी देवी भागवत, आणि सप्तशतीचे पाठ यासह सायंकाळी हरिपाठ, हरिकीर्तन अशा अखंड नामस्मरणाचा जागर येथे सुरू आहे.
परिसरातील भाविक तर दर्शनाला येतातच मात्र आता या परिसरात समृद्धी शुगर नावाने एक साखर कारखाना सुरू झाला आहे. आणि त्यामुळे मंदिर आणि परिसरात येणाऱ्या भाविकांची संख्या ही वाढली आहे. पर्यायाने उद्योग व्यवसायाला चालना मिळून येणाऱ्या भाविकांची संख्या वाढल्यामुळे मंदिराच्या उत्पन्नातही भर पडली आहे. अन्य वेळी भाविक इथे मोठ्या श्रद्धेने येतात आणि इथेच स्वयंपाक करून देवीला नैवेद्यही अर्पण करतात. अशी ही देवी देहेगाव ची रेणुका माता भक्तांच्या संकटाला धावून येते असा अनुभव भक्तांना आलेला आहे.
एम.डी. पोहनेरकर 8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com