ज्यांना गणित कळत नाही ते राजकारणात- मंत्री सत्तार यांचा खैरे यांना टोला
जालना- ज्यांना गणित कळत नाही ते राजकारणात आले, असा टोला कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना लगावला आहे .एकनाथ शिंदे हे 15 आमदार घेऊन काँग्रेसकडे गेले होते असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे आणि या वक्तव्याचा सत्तार यांनी चांगला समाचार घेतला .
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या शिवसेनेच्या वतीने आज “हिंदूगर्व गर्जना मेळाव्याचे” आयोजन करण्यात आले होते. जालना शहरातील नगर भवन जवळ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये हा मेळावा पार पडला. अकरा वाजता सुरू होणारा मेळावा दुपारी दोन वाजता सुरू झाला .तरी देखील सभागृह पूर्णपणे भरलेले होते. दरम्यान या मेळाव्याला राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार ,हिंगोली चे खासदार हेमंत पाटील, शिवसेनेचे उपनेते विजय नहाटा, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सविता किवंडे, यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान यावेळी बोलताना मंत्री अब्दुल सत्तार यांनी स्थानिक प्रश्नांना हात घालत जालना शहरातील रस्ते आणि जालना शहराचे वैभव असलेल्या मा. कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहाच्या दुरावस्थेबद्दल संताप व्यक्त केला, तसेच आमदार कैलास गोरंट्याल यांचे नाव न घेता ते कोणते सम्राट आहेत? हे सर्वांनाच माहीत असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान यावेळी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, खासदार हेमंत पाटील, उपनेते विजय नहाटा आदींनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमानंतर आमदार अशोक चव्हाण, यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या आरोपाबद्दल चांगलाच समाचार घेतला. नेमके काय म्हणाले ते आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता.
एम.डी. पोहनेरकर 8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com