…असं लोक म्हणतात- वर्षा मीना झेडपी सीईओ
जालना- जिल्हा परिषदेच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून 2018 ची तुकडी पास झालेल्या भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी श्रीमती वर्षा मीना यांनी आज पदभार स्वीकारला. मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिंदल यांचा निरोप समारंभ आणि श्रीमती वर्षा मीना यांचा स्वागत समारंभ दोन्ही कार्यक्रम जिल्हा परिषदेमध्ये एकदाच पार पडले . त्यानंतर edtv news ला दिलेल्या खास मुलाखतीत त्या म्हणाल्या की, “मी स्वभावाने कडक आहे असं लोक म्हणतात,”
दरम्यान आज पहिल्याच वेळेस श्रीमती मीना या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जालना जिल्हा परिषदेत हजर झाल्या आहेत. यापूर्वी त्यांनी नाशिक येथे दोन वर्ष प्रकल्प संचालक आणि उपविभागीय अधिकारी म्हणून काम केलेला आहे. पूर्वी सुरू असलेली चांगली कामे पूर्ण करायची आहेत आणि नवीन चांगली कामे हाती घ्यायची आहेत असे धोरण त्यांचे असणार आहे. राजस्थान मधील ढोरपूर येथे जन्म झालेल्या श्रीमती मीना यांचे शिक्षण केंद्रीय विद्यालयातून झाले. वडील शासकीय सेवेत असल्यामुळे त्यांचीनेहमी बदली होत होती आणि त्यानुसार मीना यांची ही शाळा बदलत होती. इलेक्ट्रिक इंजिनियर मधून त्यांनी 2014 सालीबीटेक ही पदवी प्राप्त केली आणि 2018 मध्ये त्या अधिकारी म्हणून परीक्षा पास झाल्या. या सर्व गोष्टींचा उहापोह त्यांनी स्वतः पहिल्याच दिवशी आणि पहिल्याच वेळेस edtv news ला दिलेल्या विशेष मुलाखतीत केला आहे. आत्तापर्यंत महसूल प्रशासनात काम केलेल्या श्रीमती मीना यांना आता जिल्ह्याचा डोलारा सांभाळायचा आहे. याविषयी त्यांनी काय सांगितलं आहे हे त्यांच्या शब्दात ऐका आणि पहाफक्त edtv news च्या या विशेष मुलाखतीमध्ये.
एम.डी. पोहनेरकर 8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com