Jalna Districtजालना जिल्हा

पिट लाईन देईल विकासाला गती- सोमवारी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

जालना-केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नातून जालन्यात सुरू होत असलेल्या रेल्वे पीट लाईनच्या कामामुळे जालन्याच्या विकासाला आणखी एक चाक लागणार आहे .त्यामुळे जालनेकरांच्या उद्योग, व्यवसायाला गती देण्यासाठी हे चाक महत्त्वाचे ठरणार आहे.

येत्या सोमवारी तीन तारखेला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्या हस्ते पीट लाईनच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे .या संदर्भातील जय्यत तयारी सध्या रेल्वे स्थानक परिसरात सुरू आहे. रेल्वे स्थानक परिसरातच भव्य सभा मंडप उभारण्यात येत आहे. स्थानकाची रंगरंगोटी, स्वच्छता, रस्ता दुरुस्ती ,ही सर्व कामे हाती घेण्यात आली आहेत .या कामांची पाहणी रेल्वेचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेंद्रकुमार मीना, वरिष्ठ विभागीय कार्यक्रम व्यवस्थापक जय पाटील, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक नागवेंद्र प्रसाद यांच्यासह स्थानिक अधिकाऱ्यांनी केली आहे.


*पीट लाईन*
दोन दिवस- तीन दिवस सलग चालणाऱ्या गाड्यांना देखभाल दुरुस्तीची गरज असते .त्या अनुषंगाने लांब पल्ल्यांच्या गाड्या इथे देखभाल दुरुस्तीसाठी थांबू शकतील. तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या देखील जालना स्थानकातून सुटू शकतील. त्यामुळे आहे त्या चार पटऱ्यांपेक्षा अधिक पटऱ्या वाढविण्याचे कामही सुरू होईल. भविष्यामध्ये रेल्वेचे कर्मचारी ,त्यांची निवासस्थाने आणि एकूणच रेल्वेचा डोलारा वाढणार आहे .या सर्व देखभाल दुरुस्तीसाठी लागणाऱ्या मनुष्यबळामुळे जालन्यातील अनेकांना रोजगारही उपलब्ध होईल. तसेच त्यांच्यासाठी इतर उद्योग व्यवसाय देखील उभे करता येतील. उद्योजकांना आपला माल लांब पल्ल्याच्या ठिकाणी नेऊन विकून जास्त फायदा कमावता येऊ शकतो .अशा अनेक बाजूने जालनेकरांसाठी ही पीट लाईन म्हणजे गतीचक्र ठरणार आहे.

एम.डी. पोहनेरकर 8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com

Related Articles