आधी केला नमस्कार मग साईबाबांनाच दाखविला चमत्कार!
अंबड -आधी केला नमस्कार मग साईबाबांना दाखविला चमत्कार. अंबड येथील इच्छापूर्ती साईबाबा मंदिराची दानपेटी फोडताना दोन अल्पवयीन मुले सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहेत. अंबड पोलीस या दोन्ही मुलांचा शोध घेत आहेत. मात्र अद्याप पर्यंत कोणतीही तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झालेली नाही. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास दोन मुले अंबड येथील इच्छापूर्ती साईबाबा मंदिरात आली. प्रथेप्रमाणे त्यांनी अगोदर बाहेर दर्शन घेतले नंतर मंदिरात प्रवेश केला. साईबाबांच्या चरणी माथा टेकवला आणि साईबाबांचा चमत्कार न पाहता या दोघांनीच साईबाबांना चमत्कार दाखवला. मंदिरातील दानपेटी फोडली, दरम्यान दानपेटीतील चिल्लर खाली पडल्यामुळे आवाज झाला आणि मंदिराच्या पाठीमागे राहणाऱ्या व्यवस्थापकांच्या ही बाब लक्षात आली. त्यामुळे या घरातील महिला धावत पळत मंदिराकडे आल्या. तोपर्यंत ही मुले हातात मिळतील तेवढे पैसे घेऊन पसार झाली होती. मुले अल्पवयीन असल्यामुळे तक्रार देणे टाळले जात आहे परंतु पोलिसांनी लगेचच घटनास्थळ गाठून पाहणी केली आणि या मुलांचा शोध घेणे सुरू केले आहे.
एम.डी. पोहनेरकर 8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com