जालन्यात पिटलाईनच्या कामाचे केंद्रीय मंत्री वैष्णव यांच्याहस्ते भूमिपूजन

जालना-केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना मराठवाड्यातील “जो जे वांछील तो ते लाहो” म्हणणारे संत ज्ञानेश्वर माऊली आणि मराठवाडी पुरणाची पोळी या दोन गोष्टी भावल्या आहेत,” मी पुरणपोळी खाण्यासाठीच जालन्यात आलो आहे. अशी प्रांजळ कबुली केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी भव्य सभा मंडपात दिली.
जालना रेल्वे स्थानकावर पीट लाईनच्या भूमिपूजनाचे उद्घाटन श्री. वैष्णव यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे, आ. कैलास गोरंट्याल, आ. संतोष दानवे, आ. नारायण कुचे, माजी मंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर. यांच्यासह रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सुमारे 20 मिनिट दिलखुलास भाषण केले .कोणत्याही सरकारवर टीकाटिप्पणी न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कशा पद्धतीने काम करतात याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली. दरम्यान देशभरातील इतर रेल्वे स्थानकाप्रमाणेच जालन्याचे रेल्वे स्थानक असायला हवं अशा सूचना श्री. मोदी यांनी दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले, आणि त्यामुळेच 200 कोटी रुपये खर्च करून जालन्याचे रेल्वे स्थानक अत्याधुनिक आणि जालन्याचे आराध्य दैवत असलेल्या राजूरच्या गणपतीची प्रतिकृती होणार असल्याचे ते म्हणाले. त्यासोबत पीट लाईनमुळे इथे हजारो हातांना काम मिळणार आहे, नवनवीन उद्योग येतील. एवढेच नव्हे तर लातूर येथे कोच कारखाना आणि जालना येथे पिटलाईन या दोन्ही प्रकल्पांमुळे भारताचे लक्ष आता मराठवाड्याकडे लागणार आहे आणि आतापर्यंत मराठवाड्याला जो मागासलेपणाचा धब्बा लागला आहे तो मिटला जाईल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी सर्वच मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. सुरुवातीला सभामंडपामध्ये कळ दाबून पीटलाईनचे भूमिपूजन केल्याचे जाहीर केले आणि त्यानंतर रेल्वे मैदानाच्या बाजूला प्रत्यक्ष येऊन स्वतः जेसीबी चालवला आणि अधिकृतरित्या पीट लाईनचे उद्घाटन झाल्याचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केले.
दरम्यान मी जालन्यामध्ये उद्घाटन करण्यासाठी नव्हे तर पुरणपोळी खाण्यासाठी आलो आहे. मी वारंवार खासदार दानवे यांना पुरणपोळी आणण्यास सांगितली होती मात्र त्यांनी नेहमीच काही ना काही तरी कारण सांगून टाळले आहे. आज पुरणपोळी खाल्ल्याशिवाय मी जाणार नाही आणि मला जर त्यांनी पुरणपोळी नाही दिली तर मी देखील पैसे देणार नाही असेही मिश्किल पणे ही ते म्हणाले. त्यासोबत मराठवाडा ही संतांची भूमी आहे. त्यामुळे संत ज्ञानेश्वरांचा प्रभाव आमच्यावर आहे. लहानपणी आम्हाला संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानाचे धडे आम्ही गिरविले आहेत, आणि त्यामुळेच त्यांनी जसे म्हटले “जो जे वांछील तो ते लाहो” त्या या प्रमाणेच रेल्वे मंत्रालय ज्यांना जे हवं त्यांना ते देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याचाच एक भाग जालना आणि संभाजीनगर येथील पीट लाईनच्या कामाचा शुभारंभ असल्याचेही ते म्हणाले.
*छत्रपती संभाजी नगर*
दरम्यान भाषण सुरू असतानाच नेहमीच्या ओघाप्रमाणे तोंडातून औरंगाबाद हा शब्द निघून गेला आणि त्यानंतर त्याला सावरत श्री .अश्विनी यांनी पुन्हा एकदा औरंगाबाद नव्हे तर छत्रपती संभाजी नगर असा नामोल्लेख केला.
एम.डी. पोहनेरकर 8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com