Jalna Districtजालना जिल्हा

गटनेत्याचे पत्र कचऱ्यात; शिवसेनेने दाखवला झटका.

 घनसावंगी- (बालासाहेब ढेरे)पंचायत समितीच्या गटनेत्याने तक्रार केल्यानंतरही त्याची चौकशी न करता राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्याने साधी तक्रार केली तरी त्याची त्याच दिवशी चौकशी सुरू होते .या अडचणीला वैतागलेल्या घनसांवगी तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सोमवार दिनांक तीन रोजी आत्मदहनाचा इशारा दिला होता.

दरम्यान गटविकास अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे घनसावंगी पंचायत समितीचे शिवसेनेचे गटनेते अनिरुद्ध शिंदे यांनी दिनांक 21 रोजी गटविकास अधिकाऱ्यांना पत्र देऊन घनसांगी तालुक्यातील शेततळे जनावरांचे गोठे सिमेंट बंधाऱ्याची चौकशी करण्याची मागणी केली होती.

विशेष करून बोरगाव येथील दलित वस्तीत खर्च झालेल्या निधीची चौकशी करावी अशी ही मागणी केली होती. मात्र यात मागणीकडे दुर्लक्ष करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या चौकशीकडे लक्ष दिले जात आहे पंचायत समितीमध्ये सुमारे साडेचारशे तक्रारी आले आहेत त्या तक्रारींची अनुक्रमे चौकशी न करता शिवसेनेच्या विरोधात आलेल्या तक्रारींची चौकशी केल्या जात आहे असा आरोप गटविकास अधिकाऱ्यांवर करण्यात आला आहे याच्या निषेधार्थ शिवसेना तालुकाप्रमुख उद्धव मरकड यांच्या नेतृत्वात सोमवारी आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला होता परंतु गटविकास अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे अजूनही या प्रकरणांची चौकशी झाली नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा घनसावंगी शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.

एम.डी. पोहनेरकर 8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com

Related Articles