ग्रामीण भागात विचारांची पेरणी आवश्यक – प्रा.दासू वैद्य
घनसावंगी- ग्रामीण भागामध्ये विचारांची पेरणी आवश्यक आहे कारण ते लवकर उगवण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे 42 वे मराठवाडा साहित्य संमेलन हे ग्रामीण भागासाठी पर्वणी ठरणार ठरेल, असा विश्वास प्रसिद्ध कवी प्रा. दासू वैद्य यांनी व्यक्त केला. माजी आमदार शिवाजी चौथे यांची संस्था असलेल्या संत रामदास महाविद्यालय घनसावंगी यांना या साहित्य संमेलनाचे यजमानपद मिळाले आहे. त्या अनुषंगाने या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून शिवाजी चोथे यांच्या उपस्थितीत आज साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे आणि कार्यालयाचे उद्घाटन प्रा. दासू वैद्य यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला कवयित्री संजीवनी तडेगावकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर, ए. जे. बोराडे, आदींची उपस्थिती होती.पुढे बोलताना प्रा. दासू म्हणाले,” ग्रामीण भागातून अशा साहित्य संमेलनामुळे विचारांची देवाण-घेवाण होते आणि नवीन विचारांची पेरणीही होते. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागामध्ये पेरलेले विचार लवकर उगवण्याची शक्यता जास्त असते. त्यातच एकीची भावना ही जास्त असल्यामुळे अशा प्रकारच्या संमेलनातून मांडलेले विचार नक्कीच यशस्वी होतात.”
दरम्यान यावेळी मान्यवरांची समायोजित भाषणे झाली. कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी आणि परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिलीप पोहनेरकर 9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com