Jalna Districtजालना जिल्हाराज्य

नाशिक जवळ ट्रॅव्हल्स आणि टँकरचा भीषण अपघात दहा प्रवासी जळाल्याची शक्यता

नाशिक -नाशिक जवळ आज दिनांक 8 रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास ट्रॅव्हल्स बस आणि टँकरमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये सुमारे दहा प्रवासी जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

यवतमाळ येथून मुंबईकडे जाणारी एका ट्रॅव्हल्स बस आणि टँकर या दोघांमध्ये नाशिक जवळील आडगाव पाटीजवळ भीषण अपघात झाला या अपघाताच्या आवाजाने परिसरातील लोक घटनास्थळाकडे धावले, तोपर्यंत बसने पेट घेतलेला होता, अशीच पेटती बस 60 ते 70 फूट पुढे चालत गेली. दरम्यान जे प्रवासी जागे होते त्यांनी पटापट बस मधून बाहेर उतरण्याचा प्रयत्न केला, आणि त्यांचा जीव वाचला, मात्र झोपीत असलेले प्रवासी तसेच अडकून राहिले त्यामुळे सुमारे दहा प्रवासी जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. परिस्थितीचे गांभीर्य पाहून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदत कार्याला सुरुवातही केली होती. अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका या घटनास्थळी दाखल झाल्यानंतर ही आग आटोक्यात आणण्यासाठी अर्धा तास लागला. प्रत्यक्ष दर्शीनी सांगितल्यानुसार या ठिकाणी गतिरोधक नसल्यामुळे वारंवार येथे अपघात होतात आणि बस पेटली त्यावेळेस देखील दोन्ही वाहनांची गती मर्यादेपेक्षा जास्त असण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. तसेच बसमध्ये दहापेक्षा जास्त प्रवासी जळून ठार झाले असल्याचेही शक्यता अपघात स्थळी दाखल झालेल्या परिसरातील नागरिकांनी वर्तवली आहे.

दिलीप पोहनेरकर 9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button