दिव्यांग व्यक्तींसाठी तपासणी व प्रमाणपत्र वाटप शिबिर
जालना- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने जालना जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे .दिनांक 10 ते 14 ऑक्टोबर दरम्यान रोज सकाळी नऊ ते पाच वाजे दरम्यान हे शिबिर पुढील नियोजित ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे .जिल्हा सामान्य रुग्णालय जालना, उपजिल्हा रुग्णालय अंबड, तसेच ग्रामीण रुग्णालय बदनापूर, घनसावंगी ,परतुर, मंठा, जाफराबाद भोकरदन येथे देखील हे शिबिर पार पडणार आहे. दिव्यांग व्यक्तींनी शिबिराला येताना सोबत आधार कार्ड, दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, यापूर्वीचे एक्स-रे, डिस्चार्ज कार्ड किंवा उपचाराची प्रमाणपत्र सोबत आणावीत असे आवाहन करण्यात आले आहे. तपासणी केल्यानंतर प्रमाणपत्राचे ही वाटप होणार आहे.
दिलीप पोहनेरकर 9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com