आईचा खून करणाऱ्याला जन्मठेपेची शिक्षा
जालना- दारू पिण्यासाठी धान्य विकू देत नाही म्हणून रागावणाऱ्या बायकोच्या आणि आईच्या विरोधात जाऊन रागाच्या भरात आईचा खून करणाऱ्या इसमाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एम. मोहिते यांनी ही शिक्षा सुनावली आहे .परतुर तालुक्यातील लोणी येथील रहिवाशी सखाराम यमाजी शिंदे, याला दारू पिण्याची सवय होती आणि त्यामुळे तो घरच्यांना त्रासही देत होता. एवढेच नव्हे तर घरातील धान्य विकून दारू पिण्याची सवय वाढली. दिनांक पाच ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास सखाराम शिंदे हा घरातील धान्य घेऊन दारू पिण्यासाठी जाऊ लागला, त्यावेळी त्याच्या पत्नीने त्याला अडवले. पत्नीच्या अडवण्याचा राग आईवर काढत त्याने आईलाही शिवीगाळ केली आणि हाता पायावर वेळूच्या काठीने मारहाण केली. यामध्ये जन्मदात्या आईच्या डोक्याला देखील मार लागला ,तिचे हातपाय मोडले. अशा परिस्थितीमध्ये आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात श्रीमती शिंदे यांना भरती केले. प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथील सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले.
दरम्यान जालना येथे आणल्यानंतर डॉक्टरांनी तपासून या महिलेला मृत घोषित केले. याप्रकरणी आरोपी सखाराम शिंदे यांच्याविरुद्ध भादवि कलम 302 अन्वये खुनाचा गुन्हा आष्टी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पूर्ण करून आष्टी पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याची सुनावणी सुरू झाली. या सुनावणीचा आज दिनांक 10 रोजी निकाल लागला आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एम. मोहिते यांनी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याच सोबत पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास पुन्हा सहा महिने सश्रम कारावास भोगाव लागणार आहे .या प्रकरणांमध्ये सरकारच्या वतीने सहाय्यक व अतिरिक्त सरकारी वकील जयश्री बोराडे यांनी काम पाहिले. या सुनावणी दरम्यान सात साक्षीदार तपासण्यात आले होते. त्यामध्ये मृताचे शवविच्छेदन करणारे वैद्यकीय अधिकारी, तपासी अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.
एम.डी. पोहनेरकर 9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com