Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

उद्योजक, व्यावसायिकांनो करा सादरीकरण आणि मिळवा हजारोंचे बक्षीस

जालना-
🎯 *जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण स्पर्धा  (District Level Bootcamp & Pitching Competition)*
जिल्ह्यातील नागरिकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता  व नाविन्यता विभागाद्वारे महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेच्याआयोजन करण्यात आली आहे.

➡️जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण स्पर्धा सत्र *दि.१३ ऑक्टोंबर, २०२२ रोजी सकाळी 9 वाजता जे.ई.एस. महाविदयालय, जालना* येथे आयोजन.

➡️ प्रशिक्षण शिबिरास नवउद्योजकतेबाबतचे माहिती सत्र, स्थानिक उद्योजक व तज्ञ मार्गदर्शक यांची व्याख्याने.➡️सादरीकरण सत्रासाठी स्पॉट नोंदणीची सोय.

➡️नोंदणी केलेल्या नागरिकांना स्थानिक समस्येसाठी उत्तम उपाय म्हणून व्यवसायाची नवसंकल्पना *1) कृषी, 2) शिक्षण, 3)आरोग्य, 4)सस्टेनिबिलिटी (कचरा व्यवस्थापन, पाणी, स्वच्छ उर्जा इ.), 5)ई-प्रशासन, 6)स्मार्ट पायाभुत सुविधा आणि गतिशीलता आणि 7)इतर* या क्षेत्रातील आपल्या नाविन्यपूर्ण व्यवसाय संकल्पनांचे प्रत्येकी १० मिनिटात सादरीकरण जिल्हास्तरीय तज्ञ समितीसमोर करण्याची संधी.
➡️जिल्हास्तरावर अव्वल ०३  पारितेषिक विजेते घोषित केले जातील.  *(प्रथम  रू २५,०००/-, द्वितीय  रू. १५,०००/-,  आणि तृतीय  रू १०,०००/-)*🎯 *राज्यस्तरीय विजेत्यांची घोषणा (State Level Announcement of Winners)*➡️प्रत्येक जिल्हयातील सादरीकरण सत्रातील सर्वोत्तम ३ संकल्पनांमधून राज्यस्तरीय निवड तज्ञ समितीसमोर अंतिम २१ विजेत्यांची निवड करण्यात येईल.➡️विजेत्यांना रोख अनुदान तसेच, सदर विजेत्यांना पेटेंट सहाय्य, इन्क्युबेशन सहाय्य, बीज भांडवल/निधी साठी सहाय्य, नाविन्यता परिसंस्थेतील महत्वाच्या संस्था व तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन, तसेच सॉफ्टवेअर क्रेडीटस, क्लाऊड क्रेडीटस इत्यादी सारखे इतर लाभही पुरविण्यात येणार आहेत.
➡️यामध्ये विविध *७ क्षेत्रातील* राज्यस्तरीय विजेत्यांना *प्रथम पारितोषिक रू. १,००,०००/- व व्दितीय पारितोषिक रू. ७५,०००/-, तसेच सर्वोत्कृष्ट महीला उद्योजिका यांना रू १,००,०००/-* असे २१ पारितोषिके दि. १७ ऑक्टोबर, २०२२ रोजी राजभवन, मुंबई येथे *मा. राज्यपाल* यांचे हस्ते विशेष  समारंभात वितरित करण्यात येणार आहे.
🎯 *अधिक माहितीसाठी संपर्क करावा*
*संपर्क अधिकारी* – श्री कैलास काळे
*मोबाइल नंबर* – ९५३६४२७७७७
अथवा सहायक आयुक्त, जिल्हा कौशल् विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, २ रा मजला, जालना यांचेकडे प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी ०२४८२-२९९०३३ यावर संपर्क करावा.
➡️ नवसंकल्पनांचा सहभाग नोंदविण्यासाठी www.mahastartupyatra.in किंवा www.msins.in वर भेट द्या.

एम.डी.पोहनेरकर 9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button