Jalna Districtजालना जिल्हाराज्य

ऐका हो ऐका!!! श्रीरामांच्या मूर्ती चोरीची माहिती देणाऱ्याला दोन लाखांचे बक्षीस

जालना- घनसावंगी तालुक्यातील समर्थ रामदास स्वामींचे जन्म ठिकाण असलेल्या जांब या गावातून दिनांक 21 ऑगस्ट2022 रोजी श्रीरामांच्या मूर्तींची चोरी झाली होती. दीड महिन्यापासून पोलीस प्रशासन वेगवेगळ्या मार्गाने तपास करत आहे, मात्र अद्यापही या मूर्तींचा तपास लागलेला नाही .त्यामुळे आता पोलिसांनी नागरिकांची मदत घेण्याचे ठरवले आहे ,आणि त्याचाच एक भाग म्हणून जो कोणी व्यक्ती चोरीस गेलेल्या मूर्ती संदर्भात उपयुक्त माहिती पोलिसांना देईल त्याला दोन लाख रुपयांचे बक्षीस पोलिसांच्या वतीने देण्यात येणार आहे. पोलिसांच्या वतीने आज जाहीर आवाहन करण्यात आले आहे.

21 ऑगस्टला चोरी झाल्यानंतर दिनांक 22 ऑगस्ट रोजी मंदिराचे व्यवस्थापक धनंजय वसंतराव देशपांडे यांनी श्रीराम मंदिराच्या गाभाऱ्यातून राम, लक्ष्मण, सीता ,हनुमान, या देव-देवतांच्या पंचधातूंच्या पुरातन मूर्ती चोरी गेल्याची तक्रार दिली होती. या अनुषंगाने घनसांवगी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 313 कलम 457, 380 अन्वये गुन्हे दाखल आहे. स्थानिक गुन्हे शाखा ,घनसावंगी पोलीस, विशेष पथक, या सर्व प्रकारे पोलिसांनी याचा तपास लावण्याचा प्रयत्न केला मात्र अद्याप पर्यंत कोणताही सुगावा पोलिसांना मिळालेला नाही. त्यामुळे आता दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे .साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या या पंचधातूच्या मूर्ती आहेत आणि याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये करोडो रुपयांमध्ये किंमत असल्याचे सांगितले जाते.

दरम्यान ज्या कोणी व्यक्तीला या मूर्तींविषयी माहिती असेल त्याने स्थानिक गुना शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, भ्रमणध्वनी 99 234 22 700 .
सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश धोंडे भ्रमणध्वनी 99 236 00060,आणि स्थानिक गुना शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले भ्रमणध्वनी 957 90 21 723 याच्यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

एम.डी.पोहनेरकर 9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button