पारसी टेकडीवर घनवन प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन

जालना -जिल्ह्यासाठीच नव्हे तर महाराष्ट्रासाठी भूषणावह आणि प्रेरणादायी ठरत असलेल्या पारसी टेकडी येथील घनवन प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन, उद्योजक रमेश भाई पटेल यांच्या हस्ते आज करण्यात आले.
मुंबई येथील केशवसृष्टीच्या माध्यमातून आणि एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स च्या मदतीने हा प्रकल्प सुरू होत आहे. जालना शहरात कुंडलिका नदीचे रुंदीकरण खोलीकरण आणि स्वच्छता झाल्यानंतर आता समस्त महाजन ट्रस्ट पारसी टेकडीकडे वळाले आहे. नवीन औद्योगिक वसाहत आणि नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग या दोन्हींच्या मध्ये असलेल्या या डोंगराला पारसी टेकडी म्हणतात.
गेल्या तीन महिन्यांपासून दर रविवारी इथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला जातो. जालनेकरांचा प्रचंड प्रतिसाद याला मिळाला आहे .या प्रतिसादामुळे उद्योजक, संस्था ,दाते पुढे यायला लागले आहेत, आणि या माध्यमातून इथे घनवन प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज इथे भूमिपूजन झाले. यावेळी उद्योजक सुनीलभाई रायठ्ठा, ओमप्रकाश चितळकर, सुरेश केसापूरकर, उदय शिंदे, उमेश बजाज यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. रविवार दिनांक 16 रोजी या टेकडीवर जालना शहरातील पोलीस प्रशासन, पोलीस प्रशिक्षण विद्यालय ,शालेय विद्यार्थी, नागरिक ,उद्योजक अशा सुमारे हजार लोकांचा समुदाय इथे जमून वृक्षारोपण आणि श्रमदान करणार आहे. त्यासाठी जाण्या येण्याचा रस्ता आणि रोपांची जोरदार तयारी इथे सुरू आहे. नागरिकांनी या टेकडीला ये भेट द्यावी असे आवाहन उद्योजक सुनीलभाई रायठ्ठा यांनी केले आहे.
एम.डी.पोहनेरकर 9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com