परराज्यातील विद्यार्थ्यांची पारसी टेकडीला भेट ;विकासाची घेतली माहिती
जालना- सहा महिन्यापूर्वी जालनेकरांना पारसी टेकडी हे नाव देखील माहित नव्हतं. मात्र आता हे नाव फक्त जालनेकारांपुरतं मर्यादित राहिलेले नाही तर परराज्यातही या टेकडीची ख्याती पसरायला लागली आहे.
याचाच एक भाग म्हणून दिल्ली येथील वास्तुशिल्प (आर्किटेक्चर) च्या विद्यार्थ्यांनी आज पारसी टेकडी येथे भेट देऊन या विकास कामाची माहिती घेतली. तसेच या सर्व कामाला खांद्याला खांदा लावून काम करणारे जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनीही आज पारसी टेकडीवर जाऊन विकास कामाविषयी माहिती घेतली. त्यांच्यासोबत उद्योजक सुनील रायठ्ठा, उदय शिंदे, सुरेश केसापूरकर, आदींची उपस्थिती होती.
दरम्यान जालना शहराच्या बाजूला औद्योगिक वसाहतीच्या शेजारीच असलेल्या या पारसी टेकडीवर हजारो वृक्षांची लागवड सुरू होत आहे. फक्त लागवडच नव्हे तर भविष्यात ही वृक्ष जगतील कशी? याविषयीचा देखील आराखडा तयार करण्यात आला आहे.
या आराखड्याला सकारात्मक पाठिंबा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडे देत आहेत. सध्या पावसाळा असला तरी भविष्यात या झाडांना पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून निधी उभारले जात आहे. जालनेकारांसाठीच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात आणि इतर राज्यातही अशा प्रकारच्या उपक्रमाचं नाव घेतल्या जाईल, त्यांनाही हा उपक्रम प्रेरणादायी ठरेल असा विश्वास व्यक्त केल्या जात आहे .आज राज्य राखीव पोलीस बलाचे जवान जालन्यातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक विद्यार्थी या सर्वांनीच पारसी टेकडीवर जाऊन श्रमदान केले.
एम.डी.पोहनेरकर 9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com