अध्यात्माच्या क्षेत्रात जातीला नाकारण्याचे काम संतांनी केले- अशोक देशमाने
जालना- अध्यात्माच्या क्षेत्रात जातीला नाकारण्याचे काम संतांनी केले. असे प्रतिपादन संभाजीनगर येथील प्रसिद्ध कीर्तनकार अशोक देशमाने यांनी केले.
लघुउद्योग भारतीच्या वतीने तृतीय एकत्रीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. तत्पूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संत पिठाचे मानद सल्लागार जयंत देशपांडे यांचेही बीज भाषण झाले.
जालना शहरातील कलश सीड्स च्या सभागृहामध्ये आयोजित या कार्यक्रमाला विद्या प्राधिकरणचे अधिव्याख्याता प्रमोद कुमार कुमावत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक डॉ. नितीन खंडेलवाल, लघुउद्योग भारतीचे अध्यक्ष अमर लाहोटी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
दरम्यान “सामाजिक चळवळीत संतांची भूमिका” याविषयी बोलताना श्री. देशमाने म्हणाले की, समाजात अस्पृश्यतेचे निवारण करून अध्यात्माच्या क्षेत्रात जातीला नाकारण्याचे काम संतांनी केले आहे. देवाच्या दारात सगळे समान आहेत. वारीत जाण्याचा अधिकार प्रार्थना म्हणण्याचा अधिकार, दर्शन घेण्याचा अधिकार, रचना करण्याचा अधिकार हा सर्वांनाच आहे, हे सांगून समाजापुढे एक आदर्श आचार संहिता देण्याचे काम संतांनी केले आहे. भारतीय संस्कृतीमध्ये समाज जरी वेगवेगळ्या प्रवाहात असला तरी मूळ एकच आहे, आणि शेवटही एकच आहे एकच आहे.या प्रवाहामध्ये जैन धर्म ,बौद्ध धर्म ,हिंदू धर्म, शीख धर्म, ही अशी अनेक ठीक -ठिकाणी धरणे बांधली गेली आहेत मात्र त्यांचा उगम एकाच ठिकाणाहून झाला आहे आणि शेवटही एकाच ठिकाणी होत आहे. भारतीय संस्कृती ही एकच असल्याच द्योतक या सर्व धर्मांमधून मिळतं असे ते म्हणाले. तीन तास चाललेल्या या कार्यक्रमांमध्ये जयंत देशपांडे यांनी बीज भाषण केल्यानंतर डॉ. प्रमोद कुमावत यांच्यासह मान्यवरांचे मार्गदर्शन झाले. कार्यक्रमाला सतीश भक्कड, किशोर देविदान,तीलख पारख, यांच्यासह लघुउद्योग भारतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एम.डी.पोहनेरकर 9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com