टरटर बंद करा अन्यथा तुमच्या टी… खाली मशाल लावू -भास्कर आंबेकर
जालना- फोडाफोडीचे राजकारण करून सत्ता स्थापन केलेल्या सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, जांब समर्थ येथून चोरी गेलेल्या मूर्तींचा त्वरित तपास लावावा, या आणि अन्य मागण्या संदर्भात आज ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या वतीने मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान फक्त टर-टर न करता चोरीचा तपास लावावा आणि शेतकऱ्यांना मदत करावी नाहीतर आम्ही सरकारच्या टी…..च्या खाली मशाल लावू, असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी दिला.
आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास नवीन जालन्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मशाल रॅली ची सुरुवात झाली. मस्तगड मार्गे गांधी चमन आणि मोतीबागे जवळील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या रॅलीचा समारोप करण्यात आला.
दरम्यान यावेळी बोलताना भास्कर आंबेकर म्हणाले की,” या सरकार मधील मंत्री दुष्काळाच्या काळातही सजवलेल्या बैलगाडी मधून दुष्काळाची पाहणी करत आहेत, हे दुष्काळाची पाहणी करत आहेत का आनंदोत्सव साजरा करत आहेत? हेच कळत नाही त्यासोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना अजून घनसांवगी तालुक्यातील जांब समर्थ येथील मंदिरातून चोरी झालेल्या मुर्त्यांचा तपास लावता आला नाही, खरंतर या श्रीरामांच्या नावानेच यांनी मते मागितले आहेत आणि निवडून आले आहेत, मात्र त्यांच्या मूर्तींचा तपास लावण्यात त्यांना काही स्वारस्य नाही. जिल्ह्यातील किरकोळ दोन-तीन कार्यकर्ते सोडले तर अन्य कोणताही निष्ठावान शिवसैनिक शिंदे गटामध्ये गेला नसल्याचा दावाही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी केला आहे. आजच्या या रॅलीमध्ये त्यांच्यासोबत शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरिहर शिंदे, शहर प्रमुख बाला परदेशी, दीपक रणनवरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
एम.डी.पोहनेरकर 9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com